जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कृषी विभागाच्या चुकीच्या माहितीमुळे तालुक्यातील जवळपास 70 गावातील शेतकऱ्यांना पिकविमा मिळालेला नाही.
हे वाचा..
दुचाकीवरून गेलेल्या तहसीलदारांनी दिला वाळू तस्करांना दणका | 5 वाहने जप्त |
तालुक्यात प्रत्येक 10 किलोमीटरला हवामान माफक स्टेशन असणे गरजेचे आहे, मात्र तालुक्यात असणाऱ्या 6 हवामान माफक स्टेशनमुळे पावसाचे प्रमाण 16 किलोमीटर पर्यत नोंद होत असल्याने विमा कंपन्यानी तालुक्यातील हाजारो शेतकऱ्यांना विमा नाकारला आहे,असा आरोप अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे अँड. प्रभाकर जाधव यांनी केला असून या अन्यायाविरोधात यापुढे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.






