जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात पुन्हा कोरोनाच्या संख्येत वाढ झाली आहे. दररोज एक दोन असणारी कोरोना बाधित संख्या शनिवारी 9 वर पोहचली आहे.शनिवारी वाळेखिंडी 4,बिळूर 5 येथे नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यामुळे तालुक्यातील एकूण बाधित संख्या 2079 झाली आहे.तर सध्या 38 जणावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.18 जण होम आयसोलेशन मध्ये आहेत.तालुक्यात आतापर्यत 1966 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 75 जणांचा मुत्यू झाला आहे.







