कन्नड माध्यमाच्या शाळांना अल्पभाषिक दर्जा द्यावा | मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांना निवेदन

0
23



जत,संकेत टाइम्स : सांगली जिल्ह्यातील कन्नड माध्यमाच्या शाळांना अल्पभाषिक दर्जा द्यावा,अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन व आदर्श कन्नड बळग महाराष्ट्र यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 







यावेळी जिल्ह्यातील सर्व खाजगी कन्नड माध्यमिक शाळांना अल्पभाषिक दर्जा मिळाला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या सर्व कन्नड माध्यम शाळांना अल्पभाषिक दर्जा मिळावा. जिल्ह्यातील कन्नड माध्यमाच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असणारी पदे भरावीत.कन्नड माध्यम शाळात एस.टी. प्रवर्गातील शिक्षकांची पदे सातत्याने रिक्त राहत असून या प्रवर्गातील शिक्षक उपलब्ध होत नसतील तर संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अन्य प्रवर्गातील शिक्षक भरण्याबाबत शासन स्तरावर पत्रव्यवहार करण्यात यावा.कन्नड माध्यम शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली ऑनलाईन होत नाहीत, त्या शून्य बिंदुनामावली नुसार करण्यात याव्यात.तसेच कोरोना कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या शिक्षकांना 50 लाख सानुग्रह अनुदान प्रस्ताव मंजूर करावा,अशी मागणी निवेदनात केली आहे.






सानुग्रह अनुदान प्रस्ताव मंजुरीसाठी अवर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडे पाठवला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी शिष्टमंडळाला दिली.

यावेळी जत पंचायत समितीचे माजी सभापती आर.के.पाटील,मलिकजान शेख (अध्यक्ष आदर्श कन्नड बळग महाराष्ट्र),महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे,जिल्हा कार्याध्यक्ष विरेश हिरेमठ, जिल्हा संघटक मिलन नागणे, जत तालुका अध्यक्ष गुरुबसू वाघोली उपस्थित होते.



कन्नड माध्यमाच्या शाळांना अल्पभाषिक दर्जा द्यावा,या मागणीचे निवेदन देताना आर.के.पाटील व पदाधिकारी

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here