सिध्दार्थ पब्लिक स्कूलमध्ये लीड़ स्कूल सॉप्टवेअरचे कार्यान्वित

0
2



जत,संकेत टाइम्स : जत येथील श्री.उमाजीराव सनमडीकर मेडीकल फोडेंशन जत, संचलित सिध्दार्थ पब्लिक स्कूल या सी.बी.एस.ई शाळेत दिनांक 19 फेंब्रुवारी 2021ला लीड स्कूल सॉप्टवेअरचे उद्वघाटन करण्यात आले.

सिध्दार्थ पब्लिक स्कूल जत ही जत तालुक्यातील एकमेव सी.बी.एस.ई मान्यता प्राप्त शाळा आहे. जत सारख्या ग्रामीण भागातील मुलांना केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा त्याच्या अभ्यासक्रमात जास्तीजास्त उपयोग व्हावा.संगणकाचा व टॅबचा उपयोग करुन ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रम मुलांना करता यावा यासाठी हे सॉप्टवेअर उपयोगी आहे


सध्या या लीड स्कूल कंपनीचे भारतातील 1500 से पेक्षा जास्त इंग्रजी माध्यमाच्या शाळा व सहा लाखापेक्षा जास्त विदयार्थी संख्या, दहा हजारच्या वर शिक्षक, 400 च्या वर शहरामध्ये व 20 राज्यामध्ये लीड स्कूलचे सॉप्टवेअर कार्यरत आहे.

अशा अद्यवत प्रणालीमध्ये सिध्दार्थ पब्लिक स्कूलच्या विदयार्थ्याना डिजिटल अभ्यासक्रम,डिजिटल पुस्तके, राज्यस्तरावरील स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी,नियमित सराव व परीक्षा,शिक्षकासाठी ऑनलाईन वर्ग, विद्यार्थ्याचे शंका व समाधानासाठी वेगळे क्लास प्रकारच्या सुविधा विद्यार्थ्याना यामुळे मिळणार आहेत.तंत्रज्ञानायुक्त लीड स्कूल सॉप्टवेअर प्रणालीमध्ये सिध्दार्थ पब्लिक स्कूल या शाळा सहभागी झाली आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडीकर साहेब,लीड स्कूलचे तंत्र सहाय्यक अनामिका मॅडम,प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

जत येथील‌ सिध्दार्थ पब्लिक स्कूलमध्ये लीड़ स्कूल सॉप्टवेअरची माहिती शिक्षकांना देण्यात आली.

Attachments area

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here