जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील प्रमुख नगदी पीक असणाऱ्या द्राक्षाला कवडीमोल भाव मिळत असल्याने द्राक्षपंढरी म्हणून ओळख असणाऱ्या तालुक्यातील बिंळूर,डफळापूर, जत,शेगाव परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.प्रचंड दुष्काळ,अवकाळी पाऊस आणि बेमोसमी गारपीट यापासून वाचलेले द्राक्ष यंदा कमी भावात विक्री करावी लागत आहे.





