जत,संकेत टाइम्स : जत महसूल विभागाला भ्रष्टाचाराची किड लागली आहे.महसलूचे मंडल अधिकारी, तलाठ्याकडून तालुक्यातील शेतकरी, सामान्य नागरिकांची दिवसाढवळ्या लुट केली जात आहे.जत महसूल विभागामध्ये लुटेरे गँग बनली आहे.
प्रांताधिकारी,तहसीलदार यांना महिन्याला हप्ता द्यावा लागतो,त्यामुळे असे पैसे घ्यावे लागत असल्याचे मंडल अधिकारी, तलाठी सांगत आहेत.या सर्व प्रकाराची उच्च स्तरीय त्रयस्थ अधिकारी नेमून तपासणी करून जत महसूलचा कारभार सुधारावा,अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.





