सांगली : उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जत तालुक्यातील मौजे उमराणी व पलूस तालुक्यातील दह्यारी व रामानंदनगर ग्रामपंचायतींच्या सरपंच / उपसरपंच निवडीच्या प्रथम सभा वगळता उर्वरीत जत व पलूस तालुक्यामधील ग्रामपंचायतींची सरपंच / उपसरपंच निवडणुकीची प्रथम सभा दिनांक 16 फेब्रुवारी 2021 रोजी घेणे व सदरची प्रक्रिया प्रशासकियदृष्ट्या सुरळीतपणे पार पाडण्याकामी अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्त करण्याकामी संबंधित तहसिलदार यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
संबंधित अध्यासी अधिकारी यांनी सरपंच पद सन 2020 ते 2025 चे सरपंच आरक्षणाप्रमाणे भरण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे रिट पिटीशन दाखल ग्रामपंचायती जत तालुक्यातील उमराणी व पलूस तालुक्यातील दह्यारी व रामानंदनगर मधील सरपंच / उपसरपंच निवडीच्या प्रथम सभेबाबत स्वतंत्र्यरित्या आदेश पारित करण्यात येतील.
अध्यासी अधिकारी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील तरतुदीनुसार विहीत पध्दतीचा अवलंब करून संबंधित सदस्यांना मुदतीत नोटिस काढण्याची कार्यवाही करावी. तसेच शासनाने कोविड-19 बाबत दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून सरपंच निवडणूकीची कार्यवाही पूर्ण करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.







