वाढदिवसानिमित्त आमदार विक्रमसिंह सांवत यांंनी कार्यकर्त्यांकडे मागितलं खास गिफ्ट

0
4



जत,संकेत टाइम्स : ‌काँग्रेसचे युवा नेते आमदार विक्रमसिंह सांवत यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यानिमित्त सांवत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करून एक खास गिफ्ट मागितले आहे. सध्या आलेल्या कोरोनाच्या संकट काळात केक, बॅनर बुकेवर खर्च करण्यापेक्षा साधेपणाने सामाजिक भान जपून वाढदिवस साजरा करावा. 



तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी करावा, नैराश्य आलेल्या तरुणांना आधार द्यावा. तसेच कोरोना काळात आघाडीवर राहून लढणाऱ्याना आपल्या भागातील व्यक्तींना एखादं फूल देवून प्रोत्साहन द्यावे, हेच माझ्यासाठी वाढदिवसाचं गिफ्ट असेल, असे आवाहन आमदार सांवत यांनी केले आहे.



ते म्हणाले की, ”माझा वाढदिवस उद्या असला तरी राज्यातील माझे मित्र, बंधु-भगिनी आणि कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांपासूनच वेगवेगळ्या पद्धतीने तो साजरा करायला सुरुवात केली आहे. आपल्या या आपुलकीच्या शुभेच्छांचा नम्रपणे स्वीकार करत असताना आपले आभार मानण्यापेक्षा आपल्या ऋणातच राहायला मला आवडेल. पण वाढदिवसानिमित्त मला आपल्या सर्वांकडून एक गिफ्ट हवंय. 



मी ते तुम्हाला हक्काने मागतोय आणि आपण ते मला नक्की द्याल असा मला विश्वास आहे.”आमदार विक्रमसिंह सांवत कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हणाले की, कोरोनामुळे सध्या शिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. पण अनेकांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. अशा विद्यांना मदत करण्याबाबत, स्मार्टफोन सारखी साधने घेऊन देण्याबाबत, दहावी, बारावी झालेल्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलण्याबाबत विचार करावा. 



नैराश्याने ग्रासलेल्या तरुणांना धीर देण्याचा विचार करा. आता हे आवाहन मी इतरांना करतोय असं नाही. मी स्वत: अनेक मुले, मुलींच्या शिक्षणाचा यंदाचा खर्च उचलण्याचा संकल्प माझ्या वाढदिवसानिमित्त केला आहे.

तसेच कोरोनाकाळात आपल्या गावात, परिसरात आघाडीवर राहून काम करणाऱ्या व्यक्तींचा एखादे फूल देऊन सन्मान करा. 



कोरोनाबाधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करा, यंदाच्या वाढदिवशी हेच माझ्यासाठी बर्थ डे गिफ्ट असेल, असे सांवत यांनी सांगितले. तसेच येणारा काळ हा संधीचा आणि सोबतच अडचणींचा असेल, त्यामधून आपल्या मार्ग काढावा लागेल, असा सल्ला सांवत यांनी दिला आहे. 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here