जत,संकेत टाइम्स : जत पोलीसाच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते प्रजासत्ताकदिनी गौरविण्यात आले.प्रभारी पोलीस अधिकारी उत्तम जाधव यांनी हा पुरस्कार स्विकारला.गेल्या काही दिवसात जत पोलीसांनी विविध स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
त्यांची नोंद जिल्हा पोलीस प्रमुखाकडून घेण्यात आली.त्यांनी सुचविलेल्या नुसार जत पोलीस ठाण्याला उकृष्ठ ठाणे म्हणून गौरविण्यात आले. सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्पर होत केलेल्या कामाची ही पोचपावती असल्याच्या प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.







