जत,प्रतिनिधी : जत शहरात अनेक ठिकाणी वाहन धारकांविषयी नियम लागु करण्यात आले आहेत. मात्र हे नियम असुन अडचण, नसून खोळंबा या म्हणी प्रमाणे आहेत. येथील सर्वसामान्य वाहनधारकांकडून या नियमांचे उल्लंघन होतेच, शिवाय हे नियम ज्यांनी पाळावयाचे असतात व ज्यांच्यावर हे नियम अमलात आणावयाची जबाबदारी असते त्या पोलिस कर्मचा-यांकडून या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन होत असताना पाहावयास मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहण चालकांपेक्षा पोलीसांवरच कारवाई करावी असे नागरिकांतून बोलले जात आहे.
जत शहरात नेमलेले वाहतूक पोलीसाकडून थेट वाहनचालकांची लुट होत असून हे लुटीचे आकडे डोळे फिरविणारे आहेत.कर्नाटकातील वाहने म्हणजे जतच्या वाहतूक पोलीसांना प्रवणी होती.विविध नियम दाखवून किती लुटायचे यांचेही भान नसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या त्रासाला वैतागलेल्या कर्नाटकातील वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याकडे तक्रारी केली.
तालुक्यातील अनेक वेळा भ्रष्ट्र कारभाराबाबत आरोप झालेले कर्मचाऱ्यांवर पुन्हा गंभीर आरोप करत आलेल्या कर्नाटकातील वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रश्न निकाली काढत आमदार सांवत यांनी थेट पो.नि.डिवायएसपी यांना यांची कल्पना दिली.यापुढे असले प्रकार खपवून घेणार नाही असा सज्जड इशाराही दिला.त्यांनीही तात्काळ यांची दखल घेत यापुढे कर्नाटकातील वाहनांना अडवायचे नाही,असा सज्जड आदेश या भ्रष्ट कर्मचाऱ्यांना दिला आहे.
मात्र तरीही थांबतील ते वाहतूक पोलीस कसे असा काहीसा प्रकार जतेत सुरू असून आता शहराबाहेर विविध मार्गावर या पोलीसाची तळ ठोकला आहे.चुकून एकाद्या वाहनात असणारे प्रवाशी,अवजड वाहतूक,ट्रव्हल्स,काळीपिवळी,त्
थेट वाहन धारकांना अडवून हाजोराच्या पट्टीत बेधडक वसूल या वाहतूक पोलीसाकडून सुरू असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावे लागते म्हणून मोठ्या रक्कमा उकळल्या जात असल्याची चर्चा आहे.
जेथे नो पार्किंगचा नियम आहे,तेथेच अवैध वाहतूक करणारे रिक्षा, जीप यांसारखी वाहने सर्रास उभी केली जातात. ही वाहने रस्त्यातच उभी केल्याने अनेक सर्वसामान्य वाहन चालकांना याचा चांगलाच फटका बसून अपघात होण्याची दाट शक्यता असते. एवढेच नव्हे तर एखाद्या सर्वसामान्य वाहन चालकाने ही वाहने थोडीशी बाजूला घेण्यास सांगितल्यावर त्यांना अरे रावीची भाषा ऐकावी लागते. मग अशा नियम तोडणा-या वाहन चालकांच्यात ताकत कोठून आली ? असा प्रश्न पडतो तर याचे उत्तर असते ते पोलिसाकडून घेतल्या जाणा-या हप्त्यामुळेच एवढी ताकद यांच्यात येते हे उघड सत्य आहे.अशा कायदा मोडणा-या वाहनावर कोण कारवाई करणार असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहेत. मात्र हे प्रश्न तेंव्हाच सुटतील जेव्हा तालुक्यातील लाचखोर पोलिसांवर कारवाई होईल. अशा या लाचखोर पोलिसांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
लाखोची कमाई
जत शहरात नेमलेले वाहतूक पोलीस महिन्याकाठी लाखावर वरकमाई करत असल्याची चर्चा आहे. अनेकवेळा तक्रारी झालेले कर्मचारीच या ठिकाणी सातत्याने नेमण्यामागचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गौडबंगाल काय ? असा सवाल सर्वसामान्याना पडला आहे.