मिरज : डॉ.रविंद्र आरळी यांच्या मिरज येथील सिनर्जी मल्टिस्पेशिलिटी हॉस्पिटल येथे अग्निशामक प्रशिक्षण व प्रात्यक्षिक पार पडले.या कार्यक्रमास सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे हे उपस्थित होते.
नुकतीच भंडारा जिल्ह्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत दहा चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाययोजना म्हणून सिनर्जी मल्टिस्पेशिलिटी हॉस्पिटल येथे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिके कडून प्रशिक्षण व आग लागल्यास उपाययोजना कशी करावी याबद्दल प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आयोजित करणेत आले होते.
यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी सिनर्जी मल्टिस्पेशिलिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध अग्निशामक उपकरणांची तसेच अत्याधुनिक प्रणालीची पाहणी केली.सिनर्जी मल्टिस्पेसिलीटी हॉस्पिटल येथे अत्याधुनिक आग प्रतिबंधक उपाययोजना म्हणून, स्मोक डिटेक्टर, अत्याधुनिक अलार्म सिस्टिम, आग लागल्यास तातडीची आग विझवणेसाठी उत्कृष्ट गुणवत्तेचे वॉटर स्प्रिंक्लर्स, अग्निशामक बंब,इलेक्ट्रिकल वॉटर पंप,तसेच अचानक आग लागल्यास व विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तसेच ब्रेकडाउन मध्ये पॉवर बॅकअप प्रणाली व हॉस्पिटलमध्ये सुसज्य असलेले इतर आग प्रतिरोधक उपकरणे या सर्वांची पाहणी केली.
यावेळी सिनर्जी मल्टिस्पेशिलिटी हॉस्पिटल येथे असणाऱ्या अत्याधुनिक आग प्रतिरोधक प्रणालीचे,होस्पिटल मध्ये असणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांचे श्री चिंतामणी कांबळे यांनी कौतुक केले तसेच कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास सिनर्जी मल्टिस्पेशिलिटी हॉस्पिटल हे अत्याधुनिक आग प्रतिरोधक प्रणालीसह सुसज्ज आहे असे ते म्हणाले.
सिनर्जी मल्टिस्पेशिलिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आग प्रतिबंधक प्रणालीचे प्रशिक्षण,प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.








