जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील कामात हलगर्जीपणा करणाऱ्या 4 ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार यांनी दणका दिला.त्यांची पगारवाढ रोकण्याचे आदेश त्यांनी गटविकास अधिकारी यांना दिले.
पुढल्या बैठकीपर्यत दलित वस्ती निधी खर्च करावा,अन्यथा तो निधी अखर्चित ठेवल्यास तेवढी रक्कम ग्रामसेवक व बिडिओ कडून दंड म्हणून वसूली केली जाईल,अशी तंबीही गुड्डेवार यांनी दिली.
जत तालुक्यातील रखडलेल्या दलित वस्ती विकास कामाचा आढावा गुड्डेवार यांनी घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या सभापती सुनीता पवार,जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, सरदार पाटील,गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर उपस्थित होते.
जत तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीत दलित वस्ती निधी अखर्चित ठेवण्यात आला आहे.त्या पार्श्वभूमीवर गुड्डेवार यांनी गावनिहान आढावा घेतला.काही ग्रामसवेकांकडून हलगर्जी झाल्याबद्दल त्यांनी कारवाई केली.
त्याशिवाय अखर्चित निधी 31 मार्च अखेर पर्यत खर्च करावा,अन्यथा एप्रिल महिन्यातील आढावा बैठकीत कारवाई करू असा इशारा ही गुड्डेवार यांनी दिला.त्याशिवाय ग्रामपंचायतीनी विकास निधी खर्च करावा अशा सुचनाही दिल्या.
ग्रामसेवक बेजबाबदार
तालुक्यातील अनेक ग्रामसेवक बेजबाबदार आहेत.अनेक वेळा तालुका,जिल्हा परिषदेच्या बैठकीत अखर्चित निधी,विकास कामे रखडविली जात असल्याची तक्रारी मी केल्या आहेत. आता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या इशारानंतर ग्रामसेवकांनी सुधारणार करावी.
– सरदार पाटील,सदस्य जिल्हा परिषद
जत येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार यांनी आढावा घेतला.








