जतेत घरातून 50 हाजाराचा मुद्देमाल लंपास

0
10



जत,(संकेत टाइम्स) : जत शहरातील आर.आर.कॉलेज येथे राहणाऱ्या मथूराबाई गुंडा शिंदे यांच्या घरातून प्रकाश बाबूराव माने रा.भाळवणी(मगंळवेढा)यांने सुमारे 50 हजाराचे चोरी केल्याचा गुन्हा जत पोलीसात दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी, शहराच्या आर.आर.कॉलेज लगत मथुराबाई या वन विभागात मजूर म्हणून काम करतात.बुधवार ता.14 रोजी त्यांच्या बहिनीचा मुलगा प्रकाश माने आला होता.तो रात्री मुक्कामी राहिला होता.मथूराबाई यांनी सोन्याची बोरमाळ,रोख 5 हजार मोबाईल असलेली डोक्याखाली ठेवलेली पिशवी मध्यरात्री पळवून नेहली होती.मथूराबाई यांनी चौकशीनंतर अखेर जत पोलीसात फिर्याद दिली.पोलीसांनी प्रकाश माने याला भाळवणी येथून ताब्यात घेतले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here