जत तालुक्यात कॉग्रेस,भाजपला समिश्र यश | कॉग्रेस पुढे,मात्र मोठ्या ग्रामपंचायती गमावल्या | राष्ट्रवादी निर्णायक भूमिकेत | दलित पँथरने प्रभाव दाखविला | स्थानिक आघाडींनाही यश | वाचा सविस्तर वृत्त…

0
6



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कॉग्रेस,भाजपा,राष्ट्रवादी असा रंगलेल्या लढाईत कॉग्रेस नंबर एकचा पक्ष ठरला आहे.मात्र त्यांनी शेगाव,उमराणी,उटगी,अंकले या प्रमुख ग्रामपंचायती गमावल्या आहेत.दुसरीकडे भाजपने मुंसडी मारत मोठ्या ग्रामपंचायतीसह 9 गावातील सत्ता मिळविली आहे. राष्ट्रवादीने यंदा मोठ्या दिमाखात ग्रामपंचायतीच्या सत्तेत प्रवेश केला आहे. त्याचे सुमारे 32 सदस्य निर्णायक भूमिकेत आहेत.रिपाईनेही अनेक गावात आपले उमेदवार निवडून आणले आहेत.








अपडेट बातम्यासाठी या लिंकवर सामील व्हा.




दुसरीकडे गेल्या वर्षभरात सामाजिक क्षेत्रात भरारी घेत असलेले  दलित पँथरचे नेते नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात विजयी झाले आहेत.रासपनेही आपली चुणूक दाखविली आहे.याशिवाय स्थानिक गटाचे नेते यांनी एकत्र येत केलेल्या आघाडीला तब्बल 9 गावात यश मिळाले आहे.

उमराणीत तिंरगी लढतीत कॉग्रेसची पंधरा वर्षाची कॉग्रेसची सत्ता गेली असून भाजपला 11 कॉग्रेस 4 जागावर विजय मिळविला आहे.तर शेगाव या महत्वाच्या गावात कॉग्रेसची सत्ता गमावली असून येथे भाजपा राष्ट्रवादी युतीने 12 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविली आहेत.उटगी येथे भाजपने मोठा विजय मिळवला आहे.सर्व 13 जागा जिकल्या आहेत.अंकले येथे कॉग्रेसची सत्ता गेली आहे.








भाजपा 8 कॉग्रेसला 3 जागा मिळवित सत्तांतर झाले आहे.डोर्लीत भाजप 6 कॉंग्रेस 3,धावडवाडी कॉग्रेसने 7 जागा जिंकत सत्ता कायम राखली आहे. गुड्डापूर भाजपा 5 कॉंग्रेस 4 जागा मिळवित भाजपने सत्ता मिळविली आहे.शेड्याळमध्ये भाजपा 4,कॉंग्रेस 4,शिवसेना 1जागा मिळाली आहे.वळसंग येथे झालेल्या अटीतटीच्या निवडणूकीत पुन्हा एकहाती सत्ता मिळून शकली नाही.येथे झालेल्या तिंरगी लढतीत भाजपचे 4,कॉग्रेस 4,तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते सुरेश शिंदे यांच्या गटाचा एक उमदेवार निवडणूक आल्याने सत्ताची चावी त्यांच्या हातात आहे.









सनमडी येथे भाजपला 5 तर कॉग्रेसला 4 जागा मिळाल्या असून येथे भाजपचे नेते सुनिल पवार यांनी सत्तांतर घडवून आणले आहे.भिवर्गी येथे कॉग्रेसचा मोठा विजय झाला आहे. तेथे सर्व 11 जागा जिंकत संत्तातर घडविले आहे.तर सिंगनहळ्ळी येथे कॉग्रेसने 9 जागा जिंकत सत्ता कायम राखली आहे.करेवाडी ति.येथे शिवसेना भाजपाने 7 जागा जिंकल्या आहेत.

येळदरी येथे भाजपने तीन,कॉग्रेसने 6 जागा जिंकल्या आहेत.गुगवाड येथे भाजपा 3,कॉग्रेसने 8 जागा जिंकत सत्ता कायम राखली आहेत.कुडणूर येथे भाजपने 9 जागा जिंकल्या आहेत.येथे युवा नेते विक्रम ढोणे 1 समर्थक विजयी झाला असून तालुक्यातील राजकारणात ढोणे यांनी चंचूप्रवेश केला आहे. 








घोलेश्वर कॉग्रेस 4,तर 3 अपक्ष विजयी झाले आहेत.सिध्दनाथ येथे कॉग्रेसने 9 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविली आहे.निगडी बु.कॉग्रेस 7 जागा जिंकल्या आहेत.कुलाळवाडीत भाजपची सत्ता आली आहे.7 जागा,तर कॉग्रेसने 2 जागा मिळाल्या आहेत.लमाणतांडा सर्व 9 जागा जिंकल्या आहेत.कायम बिनविरोध होणाऱ्या यंदा प्रथमच झालेल्या निवडणूकीत जालीहाळ खुर्द येथे भाजपने 6 जागा जिंकत सत्ता मिळविली असून एक जागा येथे बिनविरोध झाली होती 










 माहितीनुसार सत्ता मिळविलेली गावे


कॉग्रेस ; येळदरी,गुगवाड,मेंढीगिरी,सिध्दनाथ,धावडवाडी,उंटवाडी,घोलेश्वर,मोरबगी,निगडी बु.,सिंगणहळी,शेड्याळ


भाजप : लमाणतांडा (उ)

उटगी,कुलालळवाडी,तिकोंडी,,उमराणी,अंकले,सनमडी,गुड्डापूर,शेगाव


सर्व पक्षीय आघाडी  : कुडणूर,जाल्याळ खु.,वंळसग,लमाणतांडा (द),डोर्ली,अंकलगी,भिवर्गी,करेवाडी (ति)सोनलगी


दोन ठिकाणी समान मते

सिंगनहळ्ळी येथे विश्वजित हिप्परकर,अनिल हिप्परकर या दोन्ही उमेदारांना 313 मते मिळाली होती.त्यांच्यात चिठ्ठी काढून झालेल्या निकलात विश्वजीत हिप्परकर विजयी झाले आहेत.उंटवाडी येथेही चिठ्ठी काढून एक विजयी उमेदवार विजयी झाला आहे.


एकहात्ती सत्ता

भिवर्गी,कुडणूर,उटगी,धावडवाडी,मेंढेगिरी,सिध्दनाथ येथे एकहाती सत्ता मिळाली आहे.


कॉग्रेसला फटका 


उमराणी,शेगाव,अंकले,उटगी,गुड्डापूर या मोठ्या ग्रामपंचायती कॉग्रेसने गमावल्या आहेत.






कॉग्रेसला यश मात्र मोठ्या ग्रामपंचायतीच गमावल्या  : आ.विक्रमसिंह सांवत


तालुक्यात कॉग्रेसला यश मिळाले आहे.मात्र महत्वाच्या व मोठ्या ग्रामपंचायती आम्ही गमावल्या आहेत.तेथे का पराभव झाला यांची कारणे शोधून पुन्हा नव्या दमाने उभारू..


आ.विक्रमसिंह सांवत



14 ग्रामपंचायतीत आमची सत्ता ; माजी आमदार विलासराव जगताप


तालुक्यात आम्ही पुन्हा एकनंबर आहेत.हे सिध्द झाले आहे.ग्रामपंचायती निवडणूकीत भाजपा 14 ग्रामपंचायतीत सत्ता मिळाली आहे. मोठ्या ग्रामपंचायतीवर आम्ही सत्ता मिळविली आहे.


माजी आमदार,विलासराव जगताप




सत्तेत सहभागी  : सुरेश शिंदे,रमेश पाटील


तालुक्यातील शेगाव,उमराणी,मोरबगीसह सुमारे 10 गावातील सत्तेत आम्ही सहभागी आहोत.तर काही गावातील सत्तेच्या चाव्या आमच्याकडे आल्या आहेत.32 सदस्य आमचे निवडून आले आहेत.त्यामुळे राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले आहे.


सुरेश शिंदे,रमेश पाटील


दलित पँथरला जनतेची साथ ; भूपेंद्र कांबळे


जत तालुक्यातील गेल्या काही वर्षापासून आम्ही दलित पँथरच्या माध्यमातून काम करत आहोत.तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सत्तेतील आम्हचे अनेक उमदेवार विजयी झाले असून,जनतेनी आम्हाला चांगली साथ दिली आहे.


भूपेंद्र कांबळे, दलित पँथर जिल्हा उपाध्यक्ष



युवा नेते विक्रम ढोणे समर्थक विजयी



डफळापूर : जत तालुक्यात सामाजिक विषयावर आवाज उठविणारे युवा नेते विक्रम ढोणे समर्थक विलास सरगर कुडणूर ग्रामपंचायतीत विजयी झाला असून ढोणे यांनी तालुक्यातील सत्ताकेंद्रात चंचूप्रवेश केले आहे.तालुक्यातील भविष्यातील राजकारणातील एकप्रकारे चाहूल यानिमित्ताने स्पष्ट केली आहे.भविष्यात जत शहरासह तालुक्यात समाजहितासाठी काम करत राहू,असे ढोणे यावेळी म्हणाले.




Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here