जत तालुक्यात ग्रामपंचायत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज | 8 फेऱ्यात होणार मतमोजणी

0
12



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील एकूण 29 ग्रामपंचातीच्या 246 सदस्य पदाकरीता दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान झाले असून मतमोजणी सोमवार दिनांक 18 जानेवारी रोजी तहसिल कार्यालय समोरील जुने शासकीय धान्य गोदाम क्र.2 येथे सकाळी 8.00 वाजल्या पासून होणार असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.







पाटील म्हणाले,मतमोजणी करीता एकूण 15 टेबलची रचना करण्यात आली असून यासाठी 150 अधिकारी / कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.मतमोजणी प्रकियेवर लक्ष ठेवणेसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांची निवडणूक आयोगाकडून नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणीच्या एकूण 8 फे-या निश्चित करण्यात आलेल्या आहेत.





1) पहिल्या फेरीमध्ये . उमराणी,वळसंग 


2) दुस-या फेरीमध्ये – शेगावं, गुगवाड, येळदरी


3)तिस-या फेरीमध्ये – उटगी,मेंढेगिरी 


4) चौथ्या फेरीमध्ये – अंकले, कुडणूर,अंकलगी, भिवर्गी 


5) पाचव्या फेरीमध्ये – डोर्ली, धावडवाडी, उंटवाडी, शेडयाळ, सनमडी 


6) सहाव्या फेरीमध्ये – घोलेश्वर, गुड्डापूर, सिध्दनाथ, जाल्याळ खुर्द, करेवाडी (ति) 


7) सातव्या फेरीमध्ये – तिकोंडी, कुलाळवाडी,मोरबगी, सोनलगी, निगडी बुद्रुक 


8)आठव्या फेरीमध्ये – लमाणतांडा (द.ब), लमाणतांडा (उटगी) 



अशी फेरी निहाय मतमोजणी करण्यात येणार आहे. 






मतमोजणी करीता उमेदवार व त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून ओळखपत्रे वितरित करण्यात आली असून ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात येणार नाही.मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस विभागाकडून पोलिस उपअधिक्षक,2 पोलिस निरीक्षक,पोलिस अधिकारी,215 पोलिस कर्मचारी व 225 होमगार्ड एवढा बंदोबस्त देण्यात येणार आहे. 





जिल्हाधिकारी सांगली यांनी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केलेला असून त्यामूळे विजयी झालेल्या उमेदवारांना मिरवणूक काढून जल्लोष करता येणार नाही.तरी सर्व उमेदवार व उमेदवार प्रतिनिधी यांनी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here