सांगलीतील सावळी हे गाव अलर्ट झोन म्हणून घोषित | मृत पक्षी सापडले.

0
24



सांगली : राज्यात काही ठिकाणी बर्ड फ्लू आजाराने कोंबड्या व इतर पक्षी दगावल्याचे आढळून आले आहे.त्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात सतर्कता बाळगण्याच येत आहे.मिरज तालुक्यातील सावळी येथील वेस्टर्न प्रेसिकास्ट प्रा. लि. कंपनीच्या आवारात पक्षी मृत झाल्याचे आढळून आले आहे. या पक्षांच्या मृत्यूच्या कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने नाही.त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असून यामध्ये त्यांनी मृत पक्षी आढळून आलेल्या ठिकाणास केंद्र बिंदू मानून 10 कि.मी. त्रिज्येतील परिसरामध्ये कुक्कुट पक्ष्यांची, पक्षी खाद्यांची, अंडी खरेदी, विक्री,वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घातला आहे. तसेच सावळी हे गाव अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here