रस्त्यावर डांबराऐवजी ऑईलमिश्रित डांबर!

0
4



जत,प्रतिनिधी : जत‌ तालुक्यात नगरपरिषद,जिल्हा परिषद व बांधकाम विभागाकडे असणाऱ्या रस्त्याचे खडीकरण, मुरुमीकरण, डांबरीकरण, खड्डे भरण्याचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत; पण कामे निकृष्ट दर्जाची करून अधिकारी, ठेकेदार डांबराऐवजी ऑईलमिश्रित डांबर टाकून चुना लावत असल्याने खड्डे पुन्हा जैसेथे होत आहेत. त्यामुळे वाहनधारकांचे कंबरडे मोडत असल्याने संताप व्यक्त होत आहे.





भल्यामोठ्या जत‌ तालुक्यात नगरपरिषद, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने विविध रस्त्यांवर लाखो रुपयाची कामे संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नगरपरिषद, जिल्हा परिषदेच्या वतीने व सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सुरू असलेल्या अनेक रस्त्याच्या कामाचे खडीकरण, डांबरीकरण, खड्डे मुजवून कामे सुरू आहेत. डांबरी रस्त्यावरील खड्डे मुजवताना डांबर कमी अन् खडी जादा टाकली जात असल्याने एका आठवड्यात ‘जैसे थे’ परिस्थिती होत आहे. त्यामुळे वाहनधारकांचे कंबरडे मोडत आहे.

कामाची दर्जा निकृष्ट….

जतचे बांधकाम विभाग,नगरपरिषद,जिल्हा परिषदेकडून अनेक रस्त्यांची कामे ठेकेदारामार्फत कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; पण निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ते खड्ड्यात जातात.





सर्वाचे हात ओले


जत‌ तालुक्यात सुरू असलेल्या रस्ते कामातील दर्जा अधिकाऱ्यांच्या खूबीमुळे घसरला आहे.बांधकाम विभाग,जिल्हा परिषद,नगरपरिषदेचे दर्जाहीन कामावर तक्रार होऊ नये म्हणून तालुक्यात लोकप्रतिनिधी,जि.प.,पं.स.नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते,माध्यम प्रतिनिधीना लक्ष्मीदर्शन केले जात असल्याने सर्वांचे हाताची घडी तोंडावर बोट आहे.मोठ्या अपेक्षेने निवडणून दिलेले लोकप्रतिनिधी खड्ड्यावर ब्र शंब्द काढत नाहीत,हे विशेष..

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here