ओंकार स्वरूपा युवा आदर्श पिढी घडवेल : रत्नाकर नवले

0
2



जत,प्रतिनिधी : ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेतर्फे रक्तदान शिबिर व आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप जत पोलीस उपअधिक्षक रत्नाकर नवले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी युवा नेते आमदारपुत्र धीरज सावंत,आर.पी. आयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, जत पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडग, सांगली जिल्हा मार्केट कमिटीचे संचालक अभिजीत चव्हाण,जत पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिंनकर पतंगे,येळवीचे सरपंच विजयकुमार पोरे,ज्येष्ठ नागरिक पंचाक्षरी अंकलगी, उपसरपंच सुनील अंकलगी, मारुती मदने (साहेब)बजरंग चव्हाण, रामकृष्ण गंगणे,अँड.सागर व्हनमाने,बालरोगतज्ञ  डाॅ.नितिन पतंगे,प्रा.आ.केंद्र येळवीचे डॉ.कणसे, ओंकार स्वरूपा अध्यक्ष दीपक अंकलगी, सचिव तथा ग्रा.पं.सदस्य संतोष पाटील उपस्थित होते.






सध्याचे कोरोना रोगाचे सावट व त्यातून रुग्णांसाठी आवश्यक रक्तपुरवठा व सामाजिक बांधिलकी या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.31 रक्तदात्यांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.





 रक्ताची कमतरता लक्षात घेऊन संस्थेने रक्तदान शिबिर घेऊन जीवनदान देण्याचे कार्य केल्याने त्यांचे कौतुक पोलीस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांनी केले. नवले साहेब म्हणाले स्पर्धा परीक्षेसाठी वाचनाची प्रक्रिया प्राथमिक व्यवस्थेतून केली पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड जोपासने महत्त्वाचे आहे. पुढे म्हणाले कोणतेही यश मिळवण्यासाठी परिस्थिती आणि ठिकाण याचे महत्त्व नसते, तर त्यासाठी यश मिळविणेसाठी कष्टाचे पवित्र असायला हवे.






प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.कणसे साहेब व भूमिपुत्र प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.नितीन पतंगे यांचा “कोरोना योध्दा” म्हणून संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.ओंकार स्वरूपा या संस्थेने ग्रामीण व गरीब,गरजु जनतेसाठी आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड तयार करण्यासाठीचे शिबिराचे आयोजन करण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here