बालगाव,वार्ताहर : उमदी जिल्हा परिषद पोट निवडणूक रिपाइं स्वतंत्र लढविणार असून रिपाइंला माननारा मोठा वर्ग या मतदार संघात आहे.सक्षम उमेदवारही आमच्याकडे तयार आहे,अशी माहिती रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय काबंळे यांनी दिली.
कांबळे यांनी सोमवारी या भागाचा दौरा केला.मोरबगी येथे मतदार संघातील उमदी,बालगाव,बोर्गी,भिवर्गी,लवं
कांबळे पुढे म्हणाले की,विस्कळीत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी संघटित व्हावे.रिपाइंचा जन्म सामान्य,दुर्लक्षीत बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी झाला आहे.आपल्या समस्यासाठी संघटन मोठे प्रभावी ठरू शकते.
प्रस्तापित उमेदवारांनी सत्तेसाठी आतापर्यत वापस केला आहे.मात्र विजयानंतर त्यांना सामान्य लोकांच्या समस्या दिसल्या नाहीत.त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपण लढायचे आहे.दलित वस्ती निधी,दुर्लक्षित वस्त्यासाठीची विकासकामे,स्थानिक अडचणीसह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. कोणत्याही नागरिकांनी यापुढे अन्याय सहन करायचा नाही,आम्ही तुमच्याबरोबर आहोत,कधी हाक द्या,असे आवाहनही कांबळे यांनी केले.राजु वर्मा,शेट्टेप्पा कांबळे,संजय कांबळे,रामू कांबळे,उत्तम कांबळे,मळसिद्द कांबळे,सुरेश मांग,मल्लीकर्जून कांबळे,कांतू होनकांडे, राम कांबळे,लयाप्पा कांबळे,देवेंद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन भीमराव कांबळे यांनी केले.
मोरबगी ता.जत येथे रिपाइंची बैठक संपन्न झाली