माडग्याळ,वार्ताहर : कुलाळवाडी(ता.जत)येथील प्रसिद्ध श्री.खंडोबा देवाची पूर्व भागातील सर्वांत मोठी यात्रेच्या परंपरेला यावर्षी खंड पडत आहे.इतिहासात प्रथमच कोरोना महामारीमुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे,अशी माहिती यात्रा कमिटीकडून देण्यात आली आहे.
शासनाच्या धोरणानुसार यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावर्षी यात्रा 27/10/ 2020 ते 30/11/2020 या रोजी नोव्हेंबर रोजी भरणार होती.पंरतु कोरोना महामारीमुळे परवानगी नसल्यामुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे.
मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत फक्त धार्मिक विधी करण्यात येणार आहेत.यात्रेनिमित्त कोणतेही पारंपारिक उपक्रम रद्द करण्यात आले आहेत.यांची भाविकांनी नोंद घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.