रेशन धान्य प्रकरणातील तिघा संशयितांना अटक

0
1



जत,प्रतिनिधी : रेशन दुकानातील तांदुळ काळ्या  बाजारात विक्रीसाठी नेहणाऱ्या तिघा संशयित आरोपींना जत पोलीसांनी मंगळवारी अटक केली.याप्रकरणी प्रमोद उत्तम संकपाळ (वय 28), बसवराज विरूपाक्ष शेटे (वय 35,दोघे रा.डफळापूर) तसेच किशोर भानुदास देवकुळे (रा.जत) या तिघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.









बनाळी शाळेनजिक पिकअप टेम्पो(एम एच 10,बीआर 4265)या वाहनातून हा रेशनचा 90 हजार रूपये‌ किंमतीची 60 पोती तांदूळ जप्त केले होते.अखेर संपूर्ण तपासानंतर तिघा संशयितांना जत पोलीसांनी मंगळवारी अटक केली.हे धान्य कोठून आणले,कुठे विक्रीसाठी घेऊन जाणार होते.








याबाबत संशयिताकडे तपास करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने संशयितांना ताब्यात घेतले असून आज बुधवारी त्यांना न्यायालसासमोर उभे करण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी उपनिरिक्षक आप्पासाहेब कत्ते यांनी सांगितले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here