संख,वार्ताहर : गोंधळेवाडी (ता.जत) येथील स्वस्त धान्य दुकानाची चौकशी तालुका अन्न पुरवठा निरीक्षक कोळी आर आर कोळी ,मंडल अधिकारी मनोहर कोळी यांनी केली.गोंधळेवाडी येथे स्वस्त धान्य दुकान काशीराम गळवे यांचे आहे. मालाची रीतसर पावती दिली जात नाही.मालाचा दर विचारणा केल्यास रेशन कार्ड रद्द करतो असा दम दिला जातो.अन्न सुरक्षा रेशन कार्ड काढण्यासाठी ग्राहकाकडून अडीच ते 3 हजार रुपयेची मागणी केली जाते.
अंत्योदय व बीपीएल कार्डचे धान्ये एका महिन्यात नाही घेतल्यास त्या ग्राहकांचे कार्ड रद्द केले जाते.शासनाच्या अन्न सुरक्षा अधिनियम दि 30 जुलै 2016 च्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत नाही.अशी तक्रारी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे संपर्क प्रमुख रामदास खोत व ग्रामस्थांनी केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन तहसिलदार सचिन पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार दुकानाचे मालाचे रजिस्टर,पावती पुस्तक,स्टाँक रजिस्टर यांची तपासण्यात करण्यात आली.ग्राहकांचे जबाब घेण्यात आले.यावेळी रामदास खोत,सरपंच संजय हिप्परकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायतीचा ठराव :
स्वस्त धान्य दुकानाची चौकशी करावी.या मागणीचा ग्रामपंचायतीने ठराव केला आहे.ठराव तहसील कार्यालयाकडे पाठविला आहे.
” दुकानाची चौकशी करण्यात आली आहे. ग्राहकांचा जबाब घेण्यात आले आहेत.याचा अहवाल तहसिलदार यांच्याकडे दिला जाणार आहे.”
आर.आर.कोळी
तालुका अन्न पुरवठा निरीक्षक.
Attachments area