तेलाची भेसळ ग्रामीण भागापर्यत

0
2



जत,प्रतिनिधी : दिवाळीच्या निमित्ताने विक्री वाढल्याने खाद्यपदार्थांमधील भेसळीचा  बाजार अधिकच फोफावण्याला आहे. त्याची पाळेमुळे ग्रामीण भागापर्यत विकुरली आहेत. फराळ, मेवा-मिठाईच्या या भेसळीतून अखाद्य पदार्थांचा मारा करून कोट्यवधींची कमाई करण्यासाठी भेसळसम्राटांनी बाह्या सरकवल्या आहेत. मात्र हा बाजार जीवावर बेतणारा आहे. अन्न-औषध प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्षच आहे. अधिक नफ्याच्या हेतूने व्यवसायाबरोबरच भेसळीचा जन्म झाला आहे. पूर्वी थोडीफार होणारी भेसळ आता भयावह प्रमाणापर्यंत पोहोचली आहे. 









पातळीपासून ग्रामपातळीपर्यंत या भेसळीला रोखण्यासाठी अन्न-औषध भेसळ प्रतिबंधक यंत्रणा कार्यरत झाली आहे. त्यानुसार कठोर कायद्यांचीही तरतूद झाली आहे. पण दुर्दैवाने त्यातील त्रुटी आणि पळवाटांमुळे या कायद्याचा बडगाही तोकडा पडू लागला आहे आणि भेसळीचा भस्मासूर अधिकच भयावह होत गेला आहे.सुरुवातीला खाद्य पदार्थात काटामारीबरोबरच किमान अपायकारक असे पदार्थ तरी मिसळले जात नव्हते.







परंतु मानवतेला काळिमा फासत अन्नात माती कालवणारी वाट्टेल ती जीवघेणी भेसळ सुरू झाली आहे. उदा. दुधातील स्निग्धांश काढून घेणे, लवंगा- वेलदोड्यातील अर्क काढून घेणे, एखाद्या अन्नपदार्थात कमी प्रतिचा माल मिसळणे, मर्यादेपेक्षा जास्त अयोग्य रंग मिसळणे असे उद्योग सुरू आहेत. एखाद्या पदार्थात ते टिकवण्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त रासायनिक अंशही वापरले जात आहेत. 




यातून सकस ऐवजी शरीरास घातक पदार्थ तयार होत आहेत. फास्टफूड तसेच मिठाईसह विविध प्रकारच्या अशा खाद्यामुळे भूक भागविण्याचे काम होत असले तरी ते शरीरातील कॅल्शियम, रक्‍त कमी करण्यापासून अनेक आजाराला निमंत्रणच देणारे ठरत आहे. अशा अन्नभेसळीने जणू स्लो पॉईझनिंग अर्थात विषप्रयोगच सुरू आहे. यातून हळूहळू होणारे परिणाम काहीवेळा मात्र ताबडतोब दिसतात. त्यातून किडनी, यकृतापासून ते हृदयावरही परिणाम होतो. लकवा, दृष्टी जाणे आदींचा त्रास होतो, मृत्यूही येऊ शकतो. 



आता तर दिवाळीच्या निमित्ताने हा भेसळीचा बाजार अधिकच फुलणार, हे वर्षानुवर्षाच्या अनुभवातून स्पष्ट आहे.  महागाईने त्रस्त असणार्‍या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांपासून रस्त्यावरच्या बाजारावर आता भेसळीचा बाजारच फुलत आहे. यादृष्टीने भेसळीचे सर्व हातखंडे वापरले जात आहेत. बाजारात तेल काढलेले वेलदोडे त्याच दराने, प्रसंगी थोड्या कमी दराने विकले जात आहेत. तयार सुंठ पूड, जिरे पूड, धने पूड आदी मसाल्याचे पदार्थ रंगवून मैदा मिक्स, इसेन्स वापरून विकले जात आहेत. तुपासाठीही इसेन्स वापरले जात आहेत.  त्यामुळे ग्राहकांना ही धूळफेक लक्षात घेऊन योग्य खाद्यपदार्थ, त्यासाठी लागणारे साहित्य खरेदीचे आव्हानच आहे.





Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here