काळ्या कायद्यांविरुद्ध,एक लाख सह्यांचे निवेदन | शेतकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेसचे आंदोलन

0

सांगली : केंद्र सरकारने केलेला शेतकऱ्यांविरोधातला कायदा रद्द करावा, या मागणीसाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने एक लाख  सह्यांचे निवेदन शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांना दिले. यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम उपस्थित होते.

Rate Card सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव रचला आहे, या काळ्या कायद्यांना काँग्रेसने तीव्र विरोध केला असून गेली दोन महिने त्याविरोधात आंदोलने चालू आहेत. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून राष्ट्रपतींना सह्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे. त्यासाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने शेतकऱ्यांच्या एक लाख सह्या असलेले पत्र ना. थोरात यांच्याकडे सादर करण्यात आले.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.