पुणे शिक्षक मतदारसंघातून श्रीशैल होर्तीकर निवडणूक लढवणार ; बाबूराव खवेकर

0
49





उमदी,वार्ताहर : पुणे शिक्षक मतदार संघातुन सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव श्रीशैल होर्तीकर हे निवडणूक लढवणार असल्याची माहिती  सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष बाबुराव खवेकर यांनी दिली.







यावेळी खवेकर म्हणाले की, जत पुर्व भागात गेल्या 60 वर्षापुर्वी सर्वोदय शिक्षण संस्थेची स्थापना कॉम्रेड कल्लापाना होर्तीकर व त्यांचे बंधू कै.रामचंद्र होर्तीकर यांनी स्वर्गीय राजारामबापू यांच्या मार्गदर्शनाखाली केली. आज जत पुर्व भागात या संस्थेमुळे खेड्यातील व वाड्या-वस्तीवरील प्रत्येक वंचित मुलांना शिक्षणाची सोय होत आहे.






तसेच होर्तीकर कुटुंबिय हे स्वर्गीय राजारामबापू यांचे निकटवर्तीय आहे. आज देखील जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या विचाराने चालत असून त्यांच्या आदेशानुसार होर्तीकर कुटुंबियांची वाटचाल आहे.त्यामुळे श्रीशैल होर्तीकर यांचे शैक्षणिक श्रेञा बरोबरच सामाजिक श्रेञात देखील उल्लेखनीय कामगिरी आहे. तसेच या अगोदर त्यांच्या भगिनी रेश्माक्का होर्तीकर यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भोगले आहे व बंधु अँड. चन्नाप्पाणा होर्तीकर हे देखील जिल्हा परिषदेचे सदस्य होते.त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी यांचा फायदा होणार आहे.







श्रीशैल होर्तीकर यांनी सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्षपदाच्या कामाचा चांगला अनुभव असल्याने या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थेशी व शाळेशी त्यांचे चांगले सबंध आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यात शिक्षण झाल्याने व संस्थेची शाखा तेथेही असल्याने सोलापूर व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकांशी त्यांचा वैयक्तिक संबध असल्याने सांगली जिल्ह्यातील सर्व संस्था चालकांच्या आग्रहामुळे श्रीशैल होर्तीकर हे निवडणूक लढवणार असल्याचे खवेकर यांनी सांगितले.यावेळी शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेचे माजी संचालक मनोहर शिंदे, गणेश शेवाळे, डी.एम. हलकुडे,  एम.एस.पाटील, यु.आर.माळी आदि मान्यवर उपस्थित होते.








पुणे शिक्षक मतदार संघातुन सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव श्रीशैल होर्तीकर यांच्या उमेदवारी साठी राष्ट्रवादीचे नेते अँड. चन्नाप्पाणा होर्तीकर यांना घेऊन सर्व शिष्टमंडळ जलसंपदा मंत्री जंयतजी पाटील याची भेट घेणार असल्याचे सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेचे संचालक प्राध्यापक गणेश शेवाळे यांनी सांगितले.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here