उमदी-विजयपूर महामार्गाचे काम करावेत | तम्मणगौडा रवीपाटील यांची विजापूरचे खा.रमेश जिगजिणगी यांच्याकडे मागणी

0
7



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पुर्व भागातील महत्वाचा आंतरराज्यीय महामार्ग असणाऱ्या उमदी ते विजयपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम केंद्र सरकारकडून तातडीने करावे,अशी मागणी करत विजयपूरचे भाजपचे खासदार श्री.रमेश जिगजिणगी यांना सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती श्री.तम्मण्णागौड रवी पाटील

यांनी तसे निवेदन दिले.










विजापूर येथे 25 आक्टोबर रोजी रवीपाटील यांनी खा.जिगजिणगी यांची भेट घेत चर्चा केली.सध्या या मार्गाची प्रचंड दुरावस्था झाल्याने वाहन धारकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.हा महामार्गा महाराष्ट्र, कर्नाटकांचे दळणवळण वाढविण्यासाठी महत्वाचा महामार्ग आहे.










आपण केंद्र सरकारकडे हा लावून धरून रस्ता मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावा,अशी विंनती केली.




विजायपूर(कर्नाटक)येथे उमदी-विजयपूर महामार्गाचे कामासाठी आपण प्रयत्न करावेत,अशी मागणी खा.रमेश जिगजिणगी यांच्याकडे तम्मणगौडा रवीपाटील यांनी केली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here