जत,प्रतिनिधी : अतिवृष्ठीमुळे बाधित झालेल्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी जिरायत 25 हजार,बागायत 50 हजार मदत द्यावी,अशी मागणी माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौडा रविपाटील यांनी करत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तसा ठराव करण्यास भाग पाडले.
सोमवारी सांगली येथे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
तालुक्यातील समस्येकडे तम्मणगौडा रवीपाटील प्रखरपणे भूमिका मांडत शासनाने तातडीने आमच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी,अशी जोरदार मागणी केली.
जत तालुका कायम दुष्काळचा सामना करणारा शेतकऱ्यांचे खरीप व रब्बीत आलेले विविध पिकांचे अतिवृष्ठीमुळे हिरावून घेतले आहे.त्याचे पंचनामे सुरू आहेत.मात्र मदतीसाठी काही महिने लागू नयेत,तात्काळ मदत द्यावी,अशीही रवीपाटील यांनी मागणी केली.
त्याशिवाय जतच्या पुर्व भागातील 75 गावांना पिण्यासह शेतीच्या पाण्यासाठी नियोजन विस्तारित म्हैसाळ योजनेला राज्य सरकारने तात्काळ मान्यता द्यावी.सातत्याने होत असलेल्या अतिवृष्ठीमुळे जनावरांचे आजार बळावले आहेत.आमच्या शेतकऱ्यांचा मोठा आधार असलेली जनावरे दावणीला दगावण्याची भिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे तातडीने लसीकरण करावे.तालुक्यातील पशूवैद्यकीय दवाखाने सक्षम करावेत,डॉक्टर्स,कर्मचाऱ्याची रिक्त पदे भरावीत अशा मागण्या रवीपाटील यांनी करत सभागृहात लक्ष वेधले.यासाठी जिल्हा परिषद व सरकारने तरतूद करावी.
सांगली जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना तम्मणगौडा रवीपाटील








