जत,प्रतिनिधी : गरिबीशी दोन हात करत, स्वाभिमानाने आपल्या प्रपंचाचा गाडा ओढणाऱ्या जत तालुक्यातील सनमडी येथील 32 वर्षीय परमेश्वर उर्फ पिंटू भिमराव धायगुडे हा तरुण भिवर्गी येथे दुधाचे कॅन घेवून जाताना कॅन घेवून जाणारा ट्रॅक्टर करजगी- भिवर्गी पुलावर पलटी झाला.या दुर्घटनेत पिंटू धायगुडे याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी धायगुडे कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.श्रीसंत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने धायगुडे कुटूंबियांना आर्थिक मदत देत आपण कुटूंबियाच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले. यावेळी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे, व्यंकटेश नरुटे,सुरज मनेर सिद्धांत ऐवले शहाजी साळुंखे जयदीप मोरे व गावातील मानव मित्र उपस्थित होते.
तरुणाच्या मृत्यूस कंपनीच जबाबदार
करजगी- भिवर्गी पुलावर टॅक्टर पलटी होवून झालेल्या दुर्घटनेत पिंटू धायगुडे हा तरुणाचा मृत्यू झाला असला तरी या मृत्यूस अँग्रो हॅटसन चेन्नई डेअरीच जबाबदार असल्याचा आरोप चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी केला.चेन्नई डेअरीचे नियम व अटी हे जाचक आहेत.
या जाचक नियम व अटीमुळेच पिंटू धायगुडे याचा मृत्यू झाला आहे. पिंटू धायगुडे याने करजगी पर्यत दूध नेले. तेथे कंपनीने जो ट्रॅक्टर पुलावरून दूध आणण्यासाठी भाड्याने लावला होता.त्यातून दुधाचे कॅन नेण्यात आले. हा ट्रॅक्टर पिंटू याने भाड्याने लावला नव्हता. या ट्रॅक्टरमधून दुधाचे कॅन पोच करताना संबंधित चालक असणे गरजेचे आहे, त्याची सही न झाल्यास किंवा वेळेत दूध पोच न झाल्यास पिंटू धायगुडे याच्या अंगावर साडेचार हजार रुपये आर्थिक दंड पडणार होता.आपल्या अंगावर दंडाची रक्कम पडणार या जाचक अटीमुळेच पिंटू धायगुडे हा तरुण नाइलाजाने ट्रॅक्टरमध्ये बसला. पिंटू धायगुडे या तरुणाच्या मृत्यूस कंपनीच जबाबदार असल्याचा आरोप तुकाराम बाबा महाराज यांनी केला.
रविवारी चिकलगी मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्यासह मानव मित्र संघटनेच्या सदस्यांनी धायगुडे कुटूंबियांची भेट देत त्यांना धीर दिला व आर्थिक मदत केली.
यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले, या दुर्घटनेत पिंटू धायगुडे हा घरातील कर्ता व्यक्तीच मृत्यू पावल्याने धायगुडे कुटूंब उघड्यावर पडले आहे. पिंटूच्या जाण्याने वयस्कर आई, वडील,पत्नी, दोन मुले यांचा संभाळ करणार कोण हा मुख्य प्रश्न आहे.
चेन्नई डेअरी चालकाची चूक आहे तेव्हा त्यांनी तात्काळ धायगुडे कुटूंबियांना आर्थिक मदत द्यावी या मागणीचे निवेदन प्रशासनला देण्यात येणार आहे. चेन्नई डेअरी चालकांनी तात्काळ मदत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आहे.
करजगी दुर्घटनेतील मयताच्या कुंटुबियांना आर्थिक मदत देताना तुकारामबाबा