नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा ; पालकमंत्री जयंत पाटील | जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जात केली पाहणी

0
3



जत,प्रतिनिधी : जलसंपदा मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जत तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जात पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत,माजी सभापती सुरेश शिंदे,प्रकाश जमदाडे,आप्पाराया बिराजदार,बाबासाहेब कोडग,मन्सूर खतीब,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील,चन्नाप्पा होर्तीकर,युवक नेते उत्तम चव्हाण, सिध्दू शिरसाड,आदी मान्यवर उपस्थित होते.






परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं चांगलंच कंबरडं मोडलं गेलं आहे.सांगली जिल्ह्यालाही पावसाने तडाखा दिला आहे.

मंत्री पाटील यांनी जत तालुक्यातील येळवी,अमृत्तवाडी,डफळापूर येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. शेतकऱ्यांच्या नुकसानाची पहाणी केली.






ज्वारी, बाजरी, डाळिंब, मका अशी सर्व पिकं पावसाच्या तडाख्यामुळे मातीमोल झाली आहेत.

नुकसान झालेल्या पिकांचं नुकसान आणि आपल्या व्यथा जयंत पाटील आणि अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या.






गेल्या काही वर्षांपासूनच राज्यातील बळीराजावर संकट आलेलं आहे.कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ यामुळे वारंवार शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पिक वाया जात आहे.भेटीदरम्यान मंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर देत सरकार त्यांच्या पाठीशी आहे,असं आश्वासन दिलं.






हातात आलेलं पिक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.जत तालुक्यातील  शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय.




जत तालुक्यातील येळवी येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here