डफळापूर, वार्ताहर : जत तालुक्यातील पश्चिम भागातील गावांना जोडणारे रस्ते धोकादायक बनले असून रस्त्यावरील पुलाची उंची कमी झाल्याने पुलावरून चार-पाच फुटापर्यत पाणी वाहत असल्याने नागरिक धोका पत्करून त्यातून जात आहे.दुचाकी,पायी चालक जाणारे नागरिक वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पश्चिम भागातील मिरवाड, जिरग्याळ,एंकुडीला जोडणाऱ्या रस्त्यावर डफळापूर नजिक,मिरवाड नजिक,जिरग्याळ नजिकच्या पुलांची उंची कमी झाल्याने पुलावरून पाणी वाहत आहे.डफळापूर ते शिंगणापूर,अंनतपूरला जोडणाऱ्या रस्त्यावरील डफळापूर नजिकच्या श्री.यल्लम्मा देवी मंदिरानजिक,मिरवाड तलावाच्या पाठीमागील रस्त्यावरील पुले पाण्याखाली गेले आहेत.
त्याशिवाय डफळापूर मधून वाहणाऱ्या ओढापात्रातून जाणाऱ्या अनेक वाड्यावस्त्यांचे रस्ते बंद झाले आहेत.या सर्व रस्त्याच्या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण यांनी केली आहे.
डफळापूर-अंनतपूर रस्त्यावरील मिरवाड तलावामागील पुलावरून पाणी वाहत आहे.त्यातूनच वाहतूक सुरू आहे.