कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही !

0
2



सांगली : शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी निर्देश दिलेत

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आज नुकसानग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तात्काळ पंचनामे करून प्रस्ताव सादर करावा. 



कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. 

घरांच्या झालेल्या पडझडीचेही पंचनामे केले जातील. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत देण्याबाबत तसेच मृत जनावरांच्या मदतीबाबत आवश्यक कार्यवाही केली जाईल. खचलेले रस्ते, पूलांची तात्काळ दुरूस्ती करावी.मोठ्या कामांच्या निधीसाठी तात्काळ सर्व्हे करून प्रस्ताव सादर करावेत अशा सुचना केल्या

अतिवृष्टीसह कोरोनाची परिस्थितीही गंभीर आहे. त्यामुळे कोरोनाबाबतही आढावा घेतला. 



माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत सर्व कुटुंबांची योग्य तपासणी करावी. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी दक्षता घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा अशा सूचना दिल्या

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी तसेच जिल्ह्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here