जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असलातरी बुधवार,गुरूवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत थैमान सुरू होते.यामुळे
तालुक्यातील नद्या, ओढे फुल्ल भरुन वाहू लागले आहेत. तर रस्त्यावरुन पाणी वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. या पावसामुळे पिकांबरोबरच रस्त्यांचेही नुकसान झाले आहे.
तालुक्यात गुरूवारी सहाव्या दिवशीही परतीचा पाऊस सुरू होता.पण, बुधवारच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जोर कमी होता. गुरुवारी सकाळपासून कधी उघडीप तर कधी पाऊस पडत होता. त्यातच ढगाळ वातावरण आणि सूर्यदर्शनही होत होते. मात्र, बुधवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत तालुक्यात जोरदार पाऊस सुरूच होता. यामुळे गावोगावचे ओढे खळाळू लागले आहेत. तर माणगंगा नदीला पूर आला आहे.
बुधवारच्या पावसामुळे कांदा, भुईमूग, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक भागात तोडणीस आलेला उसही भुईसपाट झालाय.त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
संख,करजगी,बालगाव,हळ्ळी,सुसला
संख-विजापूरला जोडणारा पुल पाण्याखाली गेला आहे.









