बालगाव,वार्ताहर : गेल्या चार दिवसापासून धुँवाधार पावसामुळे बालगाव,आक्कळवाडी ता.जत परिसरातील अनेक जून्या घराची पडझड झाली आहे.शासनाने या नुकसान ग्रस्त घराचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी होत आहे.
दरम्यान विजापूर-अहमदपूर रस्त्यावर बालगाव नजिकच्या बोरनदी पात्रातील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. पोलीसांनी दोन्ही बाजूला बँरीगेट लावून बंद केला आहे.बालगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने दळवण ठप्प झाले आहे.अनेक वाड्यावस्त्याचे रस्ते बंद झाल्याने नागरिकांना घराबाहेर पडता आलेले नाही.शेतीतील कामेही ठप्प झाली आहेत.
आक्कळवाडी ता.जत येथे घराची पडझड झाली आहे.विजापूर-अहमदपूर मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.







