कंठीतील खून प्रकरणी एकास पोलीस कोठडी | तिघे फरारीच ; गोळीबार,पिस्तूलचे गुढ कायम

0
8

 



जत,प्रतिनिधी : कंठी ता.जत येथील सराईत गुंड धनाजी नामदेव मोटे (वय 42)यांच्यावर गोळीबार झाला का,नाही यांचे गुढ अद्याप कायम आहे.मृत्तदेहाजवळ पडलेले पिस्तूल व मोकळ्या पुगळ्यातून कोणी गोळीबार केला याबाबत अधिकृत्त माहित समोर आलेली नाही.





मृत्तदेहाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर या गोष्टीचा उलघडा होणार आहे.दरम्यान खून प्रकरणातील नागेश भीमा लांडगे या संशयितास पोलीसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने 14 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.अद्याप यातील तीन संशयित फरारी असून जत पोलीस,स्थानिक गुन्हे शाखेची पथके विविध भागात संशयिताचा शोध घेत आहेत.







धनाजी मोटे यांचा निर्घृणपणे डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता.ही घटना गुरुवारी रात्री घडली आहे. खून प्रकरणी चौघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यापैंकी नागेश भीमा लांडगे याला पोलीसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले आहे.

अन्य तिघे संशयित गोविंद नागेश लांडगे, मुरलीधर मधुकर वाघमारे, श्रीधर मधुकर वाघमारे, (सर्व रा.कंठी, ता.जत) हे अद्याप फरारी आहेत. 






या तिघांच्या अटकेसाठी जत पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागांची तीन पथके वेगवेगळ्या भागात रवाना झाली आहेत.अधिक चौकशीसाठी काही नातेवाइकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे पोलिस अधिक कसून चौकशी सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याने नेमका खून कशाने करण्यात आला हे समजले नाही. 






 मोटेच्या खून झालेल्या स्थळावर आढळून आलेले पिस्तूल,मोकळ्या पुंगळ्याचा वापर कोणी केली,पिस्तूल नेमके कोणाचे आहे.याचा तपास अद्याप लागलेला नाही.फरारी संशयिताच्या अटकेनंतर या सर्व गोष्टीचा उलघडा होणार असल्याचे पोलीस सुत्राकडून सांगण्यात आले.




Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here