जत,प्रतिनिधी : कोरोनामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून जत शहरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत 252 विना मास्क नागरिकांवर कारवाई करत सुमारे 75 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोना लॉकडाऊन नंतर अनलॉकमध्ये व्यवहार पुर्वरत होत आहेत.कोरोनाची भिती कायम असल्याने काळजी घेण्याची गरज आहे.यासाठी वारंवार मास्क, फिजिकल डिस्टन्स पाळण्याची सुचना प्रशासनाकडून केली जात आहे.सातत्याने सुचना देऊनही नागरिक हलगर्जी पणा करत असल्याने जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचे आदेश काढले होते.
त्यानुसार मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असलेल्या जत शहरात नगरपरिषद व जत पोलीसाकडून संयुक्त मोहिम राबवित कारवाईची मोहिम सुरू करण्यात आली होती.या मोहिमेत एका महिन्यात 252 केसेस करत 50 हजारापेक्षा जास्त दंड जतकरांकडून वसूल केला आहे. तर नगरपरिषदेकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींकडून महिन्याभरात 25 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाही जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई व पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॉपिक पोलीस कर्मचारी महादेव मडसनाळ,विठ्ठल तेली व होमगार्ड महेश मदने, दत्तू व्हाळगुळे व नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी केली आहे.








