संखात पाण्यासाठी मरणयातना,योजनेचे पाणी संपले : क्षारयुक्त पाण्याने आजार बंळावले

0

 पिण्याचे पाणी तीन वर्षापासून विकतचे

Rate Card

संख,वार्ताहर:संख ता.जत येथे तीव्र पाणी टंचाई आहे.जे पाणी ग्रामपंचायतीकडून पुरवले जाते तेही क्षारयुक्त असल्याने पिण्यायोग्य नाही.गावातील विस्तारीत भागाततर पाणीच येत नाही.पंचवीस हाजार नागरिकांना पाण्यासाठी सध्या वणवण फिरण्याची वेळ आली आहे.कोट्यावधी रुपयाची पेयजल योजना गेल्या सात वर्षापासून रखडली आहे.त्यांची सखोल चौकशी करून संखकरांना शुध्द पाणी उपलब्धं करावे अन्यथा खा.राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटनेचे नेते डॉ.भाऊसाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली अंदोलन करू असा इशारा स्वा.शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे
संख गावासाठी भिवर्गी तलावातून पाणी योजनेद्वारे ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जातो.सध्या तलावातील पाणी संपल्याने विहिरीची पाणी पातळी घटली आहे.त्यामुळे दर दहा दिवसातून एकदा काही मिनिटे पाणी नळांना येत आहे.येणारे पाणी क्षारयुक्त आहे.पाणी शुध्दीकरण केले जात नाही.त्यामुळे पिण्यासाठी नागरिक गेल्या दोन वर्षापासून जारचे पाणी वापरतात.त्यातून वापरावयास लागणारे पाणीही दहा दिवसाआडा तेही अपुरे येत आहे.त्यामुळे ग्रामस्थांची ओरड सुरू आहे.खरेतर गेल्या सात वर्षापासून स्थानिक राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनीधी पाणी योजनाचा बाजार केला.नव्याने आलेलेही गेल्या वर्षापासून योजनेचा तपास करत आहेत. निधी देऊ,पाणी योजना करू यापुढे काहीही सरकत नसल्याने संखकरांच्या भावनाचा उद्रेक होण्याची वेळ आली आहे.
सध्या नळ पाणीपुरवठा गेले तीन महिन्यापासून बंद असल्याने गावात नळ पाणी पुरवठा योजनेतून दर दहा दिवसातून एकदा मिळत होते.संखचा मोठा तलाव व नदीतील प्रंचड वाळू उपस्याने पाणी पुरवठ्याचे नदी व तलाव कोरडा पडला आहे.परिणामी जमिनीतील पाणी पातळी कमालीची घडल्याने पाणी पुरवठा योजनेचे पाणी स्ञोत पुर्णत: आटल्याने पाणी टंचाईची तीव्रता वाढली असून दर दहा दिवसाआड पाणी येत असल्याने ग्रामस्थाना प्रंचड झुंबड उडत असून लाबंच्या लांब घागरीच्या रांगा लागत आहेत.पाणी येणाऱ्या दिवशी अर्धा दिवस पाणी मिळविण्यासाठी जात आहे.गाव भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या 15 कुपनलिका, व दोन पाणी योजनेच्या विहिरीतून पाणी पुरवठा होत होता मात्र त्यातील निम्यावर कुपनलिका पाणी स्ञोत आटल्याने बंद आहेत.विहिरीहीनी तळ गाटला आहे.दोन कुपनलिका व विहिरीतून पाणी साटवून ग्रामस्थाना पाणी पुरवठा करावा लागत आहे.ते पुर्ण क्षमतेने टाकीत टाकून पाणी देण्यासाठी दहा दिवसाआड कालावधी लागत आहे.परिणामी ग्रामस्थाना पाण्यासाठी मरणयातना सहन कराव्या लागत आहे.गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पेयजल योजनेचे काम पुर्ण करून पाणी पुरवठा करावा अशी मागणी आहे.गावातील लहानापासून थोरापर्यत पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.लहान मुलीपासून सत्तरवर्षाच्या म्हाताऱ्या माणसाना पाण्यासाठी मैलो-मैल भटकंती करावी लागत आहे.

संख ता.जत येथे सध्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल चालू आहेत.आलेले पाणी मिळविण्यासाठी रांगा भिष्णता स्पष्ट करतात. पिण्याचे पाणी तीन वर्षापासून विकतचे

संख ता.जत येथे सध्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल चालू आहेत.आलेले पाणी मिळविण्यासाठी रांगा भिष्णता स्पष्ट करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.