फॅबटेक पॉलिटेक्नीकमध्ये १० वी नंतरच्या इंजिनियरिंग डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया सुरु
सांगोला : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता प्रथम वर्ष डिप्लोमा अभियांत्रीकी प्रवेशासाठी फॅबटेक पॉलिटेक्नीक सांगोला या महाविद्यालयात शासनमान्य सुविधाकेंद्र सुरु करण्यात आले आहे.या सुविधा केंद्रा मार्फत प्रथम वर्ष डिप्लोमा अभियांत्रीकीच्या प्रवेशासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया २९ मे पासून सुरु झाली असल्याची माहिती पॉलिटेक्नीक चे प्राचार्य प्रा.तानाजी बुरुंगले यांनी दिली.
सदर प्रक्रियेसाठी उत्तम गतीचे 100 एमबीपीएस क्षमता असलेल्या इंटरनेट सुविधेसह सर्व बाबी सज्य आहेत. तसेच महाविद्यालयाची शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती पाहून तंत्रशिक्षण संचालकांनी फॅबटेक पॉलिटेक्नीकला फॅसिलिटी सेंटर क्र.६७५६ केंद्र म्हणून गेल्या ११ वर्षांपासून सतत मान्यता दिलेली आहे.डिप्लोमा इंजिनियरींग हा १० वी नंतर ३ वर्षात करीयर घडविणारा कोर्स असून मेकॅनिकल व सिव्हिल शाखेमध्ये प्रवेश घेतल्यास खाजगी कंपनी बरोबरच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत काम करण्याच्या मार्ग निवडू शकतात.तसेच कॉम्प्युटर आणि इल्क्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन शाखेत प्रवेश घेतल्यास विद्यार्थी सॉफ्टवेअर कंपनी मध्ये मोठे पॅकेज असणारी नोकरी करू शकतात.
फॅबटेक च्या या सुविधा केंद्रामध्ये पालकांसाठी समुपदेशन कक्ष देखिल सुरू करण्यात आले आहे.या समुपदेशन केंद्रामार्फत प्रवेशपरक्रियेबरोबरच डिप्लोमा नंतरच्या खाजगी नोकरीच्या संधी, व्यवसायाच्या संधी , स्पर्धा परीक्षेतील संधी,उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा मुळे होणारे फायदे अशा विविध विषयावर मार्गदर्शन मिळणार असून प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिये संदर्भात अधिक महितीसाठी प्रा.अनिल वाघमोडे (86005 47478) व प्रा.महेश वाळुजकर(95118 32511) आणि डायरेक्ट सेकंड ईयर प्रवेश प्रक्रियेसाठी प्रा.राहुल काळे ( 83089 82120) व प्रा.भावना माईनकर (8408888639)यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे यांनी केले आहे.