उटगीत शेतकऱ्यांची आत्महत्या,महादुष्काळ,कर्जास कंटाळून संपविली जीवनयात्रा, कर्जमाफी कागदावरच

0

उटगी/उमदी,वार्ताहर :तालुक्यात  कोपलेला महादुष्काळ, बँकांची कर्जे,शेतीत उत्पन्न न आल्याचे नैराश्य यामुळे उटगी ता.जत येथील तरूण शेतकरी लायाप्पा रायगोंडा इंचूर यांनी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.सोमवारी सकाळी ही दुर्घटना उघडकीस आली. उमदी पोलीसात आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी,उटगी येथे लायाप्पा रायगोंडा इंचूर यांची आठ एकर जमीन आहे. सध्या जमिनीत तुरीचे पिक घेतले होते. या परिसरात पाऊस झाला नसल्याने भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुरीचे पीक व्यवस्थित आलेलेे नाही.त्यांची मळणी रविवारी केली होती. सात एकर क्षेत्रात फक्त एक क्विंटल तुरी झाली होती. पाण्यासाठी त्यांनी शेतात आठशे फुट बोअरवेल्स मारले आहे.तरीही त्यास पाणी नाही.लायाप्पा यांनी पतसंस्था,विकास सोसायटी व बँकाची कर्जे काढली आहेत.उत्पन्न न आल्याने ती कशी फेडायची यांचे लायाप्पाला प्रंचड नैराश्य आले होते. त्यातूनच रविवारी रात्री घरापासून काही अंतरावरील लिंबाच्या झाडाला गळफास लावून घेतला.
सतत नापिकी व दुष्काळाने लायाप्पा वैतागला होता.त्यामुळे या दिवाळीला तो कुंटूबासह ऊसतोडीला गेला होता. रविवारी तुरीची मळणी करण्यासाठी लायाप्पाचे कुंटुबिय आले होते. उत्पन्न कमी आल्याने कुंटुबावर नैराश्य आले होते. त्यातून लायाप्पाने जिवनयात्रा संपवली.सध्या तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे.भीषण पाणी टंचाई असल्याने पिके आली नाहीत. जी पिके टँकरच्या पाण्याने जगविली आहेत.त्यांनाही आता दुष्काळाचा फटका बसत आहे.शासनाने गंभीर दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र उपाययोजना शुन्य आहेत. कागदी घोडे नाचविण्याशिवाय काहीही पुढे सरकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रंचड नैराश्य आले आहे. पिके नाहीत.शेतीसाठी काढलेली कर्जे कायम आहेत. कर्जमाफीत कोणती कर्जे माफ झाली हे निश्चित नाही. सध्या गंभीर दुष्काळ जाहीर केला आहे.तरीही बँका,पतसंस्था,सोसायट्याची कर्ज वसूली सुरूच आहे. शेतकऱ्यांना वसूलीच्या नोटीसा पाठविल्या जात आहे.उत्पन्न नसल्याने जगणे असह्य झाले आहे.त्यातच अशा कर्जवसूलीच्या नोटीस आल्याने कुंटुबावर नैराश्य येत आहे. शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे.

Rate Card

आठ एकर शेती जमिनीचा मालक बनला ऊसतोड मजूरलायप्पा यांने कर्ज काढून सात एकरात तुरी लावली होती.मात्र पाऊस न झाल्याने तुरीचे पिक वाया गेले होते. त्यात आठशे फुट मारलेल्या बोअरवेल्सला पाणी नव्हते.त्यामुळे आठ एकर शेतीचा शेतकरी ऊसतोड मजूर बनला होता.तुरीचे एक क्किंटल उत्पन्न बघून लायप्पाचे ह्रदय हेलावले होते.आपल्या मुला बाळाचे कसे होणार या विवचनेतं तो होता.त्यातून त्याने अखेर जीवनयात्रा संपवली.त्याच्या जाण्याने संघर्ष संपला नाही.तो पुढे त्यांच्या पत्नी,मुलावर कायम आहे. शासनाने दुष्काळ मुक्तीसाठी ठोस उपाययोजना या परिसराला बदलू शकतील.यंदाच्या दुष्काळातील पहिली शेतकरी आत्महत्ये नंतर शासनाचे डोळे उघडावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.