पाच कोटीच्या योजनेचा रोहयोचा मजूर ठेकेदार,संख पाणी योजना : अजब,गजब कारभाराने जनतेचे बेहाल

0

संख,वार्ताहर : संखच्या दहा हाजार लोकसंख्येसाठी सध्या एक योजना कार्यरत आहे.दुसरी भविष्यात पंचवीस वर्षाच्या लोकसंख्येच्या हिशोबाने राष्ट्रिय पेयजल मधून सुमारे साडेपाच कोटीची योजना मंजूर झाली आहे. पाणी स्ञोत अाटल्याने मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे.त्यातच क्षारयुक्त पाणी येत असल्याने गावातील सर्वच नागरिक जारचे पाणी पिण्यासाठी वापरतात.पिण्याच्या पाण्यासाठीही लोकांना पैसे मोजावे लागतात.लोकप्रतिनीधी, प्रशासनाची उदाशीनता याला कारणीभूत आहे.गावासाठी महत्वाची असणारी राष्ट्रिय पेयजल योजनेचे रखडेलेले काम करून पाणी उपलब्धं करून द्यावे अन्यथा तीव्र अंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. तसे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी,पाणी पुरवठा विभागाला दिले आहे.जत तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून संखला नंबर आहे.भविष्यात तालुका निर्मितीसाठी संखला प्रथम प्राधान्यक्रम आहे.त्या धर्तीवर येथे अप्पर तहसील कार्यालय झाले आहे.10 हाजारावर लोकसंख्या असणाऱ्या संखला पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून होरफळ सुरू आहे.गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी योजनाचे पाणी स्ञोत आटले आहे. ज्या भिवर्गी तलावाच्या उद्धवावर ही योजना आहे.त्या तलावात पाणी मृतसंचय खाली गेले आहे.त्यामुळे सध्या दहा दिवसाआड पाणी सोडले जाते.त्यामुळे अल्प पाण़्यामुळे दुष्काळी जीवन जगणाऱ्या संखकारांची तहान भागत नाही.येथील संयमी जनतेचा स्थानिंक लोकप्रतिनीधीनी सोयीप्रमाणे वापर केला आहे. पाणी टंचाई संपविण्यासाठी सात वर्षापुर्वी जिल्हा परिषद कडून 5 कोटी 40 लाखाची योजना मंजूर झाली.तत्कालीन सत्ताधारी मंडळीने मोठ्या थाटामाटात उद्घाटन करून योजनेचे काम सुरू केले. गतीने काम झाले.विहीर,पाईपलाईन, टाकीसह काही वाड्यावस्त्यावर अतर्गंत पाईपलाईन टाकण्यात आली आहे. पाण्याची चाचणी घेण्यात आली.योजनेच्या कामासाठी संबधित रोजगार हमीचा कामगार असणाऱ्या ठेकेदारांला सुमारे साडेतीन लाखाचा निधी दिला आहे. त्याहिशोबाने काम झाले नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेचा आहे.त्याशिवाय योजनेच्या संबधित लोकप्रतिनीधीनाही काम निकृष्ठ झाल्याचा साक्षात्कर झाल्याने एक कोटी आंशी लाखाचा गेल्या पाचवर्षापासून निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर पडून आहे.तो काढण्यासाठी बदलेले लोकप्रतिनीधी कडून हालचाली सुरू आहेत.त्यावरून सत्ताधारी गटाचा वादही उफाळून आला आहे. या योजनेसाठी सर्व नियम पायदळी तुडवून रोजगार हमी योजनेच्या मजूर ठेकेदार नेमला आहे.योजनेच्या कामाचे तर तीनतेरा झाले आहे.तात्रिंक सल्लागाराने काम केले आहे. तेही निकृष्ठ झाल्याचा आरोप संघटनेचा आहे.कोणतेही काम नियमानुसार झाले नाही.निधीचा गैरवापर केला आहे. त्यामुळे योजना जिल्हा परिषदेने ताब्यात घेऊन उर्वरित काम करावे अशी मागणी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर नागनाथ शिळिन,चंद्रशेखर रेबगोंड, राजू पुजारी, भिमाशंकर बिराजदार, विठ्ठल कुंभार,विश्वनाथ बिरादार, भाऊराया बिरादार,शरण्णाप्पा शिळिन, आण्णासाहेब बिरादार, हणमंतराया बिरादार आदीच्या सह्या आहेत.

पाणी योजनेचा नेत्याच्या मर्जीतील एका रोहयोचा मजूर असणाऱ्या व्यक्तीस ठेका दिला आहे. त्यांच्या सहीने ही सर्व रक्कम काढण्यात आली आहे. त्यात संबधिताला हा सर्व प्रकाराची पुर्ण माहितीही नाही.योजनेचा तात्रिंक सल्लागाराने काम केले आहे. त्यात कोणतीही कामे एमबीप्रमाणे नाहीत.नागरिकांना पाण्यासाठी मरणयातना देणाऱ्या समाजसुधारक मंडळीनी हा सगळा उद्योग केला आहे.गावभागासह 29 वाड्यावस्त्यांवर तीव्र पाणी टंचाई आहे.शासनाची कोट्यावधी रुपये खर्च करूनही पाणी टंचाई कायम आहे.सध्याही योजनेच्या निधीसाठी चिखलफेक सुरू आहे. ग्रामपंचायतीकडे निधी पडून आहे. त्यातून योजनेचे काम व विहिरी लगत कुपनलिका खोदून पाणी उपलब्धं करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा अन्यथा तीव्र अंदोलन करणार आहोत.
भिमाशंकर बिराजदार, शेतकरी संघटनेचे नेते

Rate Card

संखला पाणी पुरवठा करणारी टाकी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.