उमा कोविड हॉस्पिटलमध्ये वयोवृद्ध रुग्णांनी केली कोरोनावर मात

0जत,प्रतिनिधी : जत शहरातील आरळी चँरिटेबल ट्रस्ट व रिचर्स सेंटर येथे कोरोना रुग्णांना चांगला उपचार मिळत आहे.दहा दिवसापुर्वी दाखल झालेले संगाप्पा बिराजदार वय 65,रा.उटगी,व आप्पासाहेब बिराजदार वय 60,रा.वळसंग या वयोवृध्द रुग्णावर अत्याधुनिक व योग्य उपचार केल्याने तो कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत.
गेल्या दहा दिवसापासून ते उमा हॉस्पिटल येथे अँडमिट होते.प्रशिक्षित डॉक्टर्स, तात्काळ व योग्य उपचार पध्दतीमुळे हे रुग्ण कोरोनावर मात करू शकले आहेत.जत शहरात सुरू झालेल्या या खाजगी कोविड-19 हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सीजन, व्हेटिंलेटर व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आले आहेत.
डॉ.रविंद्र आरळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील खाजगी क्षेत्रातील उत्कृष्ट प्रतीचे हॉस्पिटल ठरत आहे.
Rate Card

 येथील उमा कोविड-19 हॉस्पिटल येथून कोरोना मुक्त झालेल्या वयोवृद्ध रुग्णांचा सत्कार करण्यात आला.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.