सांगलीच्या कोवीड सेंटर दोन कैद्यांचे पलायन

0

शिराळा,प्रतिनिधी : सांगली शहरातील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या वसतिगृहातील कोविडं सेंटर मधून दोन कैद्यांनी आज सकाळी पलायन केले आहे.राजू कोळी व रोहित जगदाळे या दोघांनी वस्तीगृहातील सेंटर मधून आज पहाटे नाट्यमयरीत्या पलायन केले.दोघेही काळी वाट, हरिपूर, जिल्हा सांगली येथील रहिवाशी आहेत.




सदरची घटना आज पहाटे घडल्याचे समजते.गेल्या आठवड्यात या दोघांना एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. दोन दिवसांच्या पोलिस कस्टडी रिमांड प्राथमिक रित्या देण्यात आला होता. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. मात्र त्याच पूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. या तपासणीचा अहवालत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.




या घटनेमुळे सदरच्या आरोपींना सांगलीतील एज्युकेशन सोसायटीच्या वस्तीगृहातील सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.मात्र आज पहाटे या दोघानि सर्वांची नजर चुकवून या केंद्रातून पलायन केल्याचे उघड झाले आहे. आज सकाळी कैद्यांची मोजणी करण्याचा प्रकार सुरू असताना सदरचा प्रकार उघड झाला आहे. या कैद्यांचा आता तपास सुरू करण्यात आला असून,पोलिस यंत्रणा त्यांचा शोध घेण्यात गुंतली आहे.

Rate Card



हे दोघेही कैदी सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे.याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघांविरोधात रीतसर गुन्हा दाखल झाला आहे.कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांनी पलायन केल्याने पोलीस यंत्रणा हादरली आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.