व्यापाऱ्यावर हल्ला करून लुटले | व्हसपेठमधिल घटना ; साठ हजाराचा ऐवज पळविला,परिसरात खळबळ

0माडग्याळ, वार्ताहर : व्हसपेठ ता.जत येथील बिल्डिंग मटेरियल दुकानदार हिराराम वालाजी चौधरी रा.व्हसपेठ यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी लोंखडी रॉडने हल्ला करत डोक्यात फरशी घालून दोन तोळ्याची चैन,मोबाईल हिसकाऊन चोरून नेहला आहे.

 दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला असून चोरट्यांना शोधण्याचे मोठे आवाहन पोलीसासमोर आहे.
घटनास्थळ व पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी,हिराराम चौधरी यांच्या मालकीचे व्हसपेठ हद्दीत माडग्याळ रोडवर हनुमान स्टील हे बिल्डिंग मटेरीयल विक्रीचे दुकान आहे.शुक्रवारी सायकांळी सहाच्या सुमारास चौधरी दुकानात असताना काही अज्ञात चोरटे दुकानात घुसले,त्यांनी अचानक चौधरी यांच्यावर लोंखडी रॉडने हल्ला केला.

Rate Card
चौधरी यांनी प्रंसगावधान राखत रॉड हातात धरला.तेवढ्यात दुसऱ्या चोरट्यांने चौधरी यांच्या डोक्यात परशीने हल्ला करत चौधरीच्या यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन,मोबाईल असा साठ हजाराचा ऐवज हिसकावून घेत तेथून पळ काढला.
 चौधरी जखमी झाले आहेत.ही सर्व घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे.चौधरी यांना जत पोलीसात फिर्याद दिली आहे. पोलीस सीसीटिव्हीच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.