बेकायदा दारूविक्रीवर जत पोलीसाचे छापे | जत,बाज,मेंढिगिरीत कारवाई ; 50 हजाराचा ऐवज जप्त

0जत,प्रतिनिधी : जत पोलीसांनी बेकायदा दारू विक्री प्रकरणी तीन ठिकाणी कारवाई केली.जत शहरातील आरळी कॉर्नर जवळील पारंडी तांडा येथे मोठ्या फौजफाट्यालसह जत पोलीसांनी छापा टाकत दारू तयार करण्याचे कच्चे रसायन,एक बँलर असा 46 हजार,हातभट्टीची तयार 25 लिटर त्यांची किंमत 1750 असा 47,750 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.
गोरख सज्जन काळे,(किरण दयानंद काळे रा पारंडी तांडा,जत) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी केरबा चव्हा यांनी फिर्याद दिली आहे.

बाज ता.जत येथील माणिक रंगा मलमे यांच्या हॉटेल डिलक्सच्या पाठीमागील बेकायदा दारू अड्ड्यावर छापा टाकत सातशे आंशी रूपये संत्रा दारूच्या बॉटल जप्त केल्या.याप्रकरणी शितल चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.


Rate Card येथील शिवाजी चव्हाण यांच्या बेकायदा दारू विक्री अड्ड्यावर छापा टाकत संत्रा व गावठी हातभट्टी दारू जप्त केली.त्यांची किंमत दोन हजार तीस रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी आमसिध्द खोत यांनी फिर्याद दिली आहे.या प्रकरणातील संशयितावर दारू विक्रेत्यावर कारवाई करून सोडण्यात आले आहे.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.