पुर्व भागातील शेतीचा कायापालट करू ; आमदार विक्रमसिंह सांवत | भिवर्गी तलावाच्या कँनॉलचे दरवाजे उघडले

0करजगी,वार्ताहर : जत पुर्व भागात कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून आलेले हे पाणी या भागातील शेतीचा कायापालट करून जनतेला समृध्द करू,असे उद्गार आमदार विक्रमसिंह सांवत यांनी काढले.
जत पुर्व भागातील भिवर्गी तलाव व करजगी बंधाऱ्यांतील पाण्याचे पुजन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

आ.सांवत म्हणाले,मी विधानसभा निवडणूकी पुर्वीपासून या योजनेतून पाणी यावे यासाठी प्रयत्न करत होतो.निवडणूकीतही या भागाचा या योजनेतून पाणी आणून कायापालट करण्याचे आश्वासन दिले होते.
आज त्यांची पुर्तता झाली आहे.मला माझ्या तालुक्यातील जनता सुखी,समृद्ध व्हावी यासाठी काम करायचे आहे.पाणी,रस्ते,विज,अशा मूलभूत सुविधा मुबलक उपलब्ध झाल्या पाहिजेत,शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ माझ्या तालुक्यातील जनतेला झाला पाहिजे, यासाठी मी पुढेही काम करणार आहे,असेही आ.सांवत म्हणाले.
Rate Card

पाण्याचे पुजन करून आ.सांवत यांनी या तलावाचा कँनॉल दरवाजे उचलून कार्यान्वित केला.त्यामुळे करजगी,बेळोंडगी, बोर्गी,बालगाव,हळ्ळी,सोनलगी,सुसलाद ते पुढे कर्नाटकातील चडचण पर्यत पाणी पोहचविण्यात येणार आहे.

यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग,संतोष पाटील,मार्केट कमिटी संचालक संजय सांवत,पाटबंधारे विभागाचे अधिकारी श्री.मोरे,शेख,करजगीचे कॉंग्रेस नेते डॉ.बशीर,संरपच सायबपाशा बिराजदार,सुभाष बालगाव,श्रीमंत आवटी,नबी जागीरदार,साहेबांना ककमरी,ज्ञानेश्वर बमनाली,आदी मान्यवर उपस्थित होते.
भिवर्गी ता.जत तलावाच्या कँनॉलचे दरवाजे उचलून कार्यान्वित करताना आमदार विक्रमसिंह सांवत व मान्यवर

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.