अल्पवीय मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस 3 वर्षे सक्तमजूरी
जत,प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस
भारतीय दंड संहिता कलम 364(ए)(1)(आय) व पोस्को कायदा कलम 8 अन्वेय दोषी धरत तीन वर्षे सश्रम कारावास,3 हजार दंड,दंड न दिल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा अतिरिक्त सह जिल्हा तथा सत्र न्यायाधीश डि.एस.हातरोटे यांनी सुनावली.सुनिल उर्फ आण्णू कुंभार (वय 33 रा.अचनहळ्ळी ता.जत)असे आरोपीचे नाव आहे.
याकामी सरकार पक्षातर्फे अति.सरकारी अभियोक्ता प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले.याबाबत थोडक्यात माहिती अशी,आरोपी हा पिडित मुलीच्या घराशेजारी राहण्यास होता.ता.20/12/2017 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पिडित मुलगी व तिचा भाऊ हे शाळेतून येत असताना फॉरेस्ट परिसरात पिडित मुलीस अडवून तिच्याशी अश्लील वर्तन केले.
त्यानंतर पिडित मुलीच्या आईने त्याबाबत आरोपीस जाब विचारला असता,आरोपीने पिडितेच्या आईस दमदाटी केली.पिडित मुलीच्या आईने जत पोलीस ठाण्यात आरोपी विरूधात फिर्याद दिली होती.या गुन्ह्याचा तपास जत पोलिस ठाण्याच्या तत्कालीन उपनिरिक्षक वर्षा डोंगरे यांनी आरोपीस तात्काळ अटक करत घटनास्थळाचा पंचा समक्ष पंचनामा केला.पिडित अल्पवयीन मुलगी,तिचा भाऊ व अन्य साक्षीदाराचे जबाब नोंदविले,तपास पुर्ण करून आरोपीविरोधात भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

या गुन्ह्याची सुनावणी अतिरिक्त सह जिल्हा तथा सत्र न्यायाधीश डि.एस.हातरोटे यांच्या न्यायालयात सुरू होती.सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले.साक्षी पुराव्याच्या आधारे भारतीय दंड संहिता कलम 364(ए)(1)(आय) व पोस्को कायदा कलम 8 अन्वये दोषी धरत आरोपी सुनिल कुंभार याला शिक्षा सुनावली आहे.