जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेचा गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे. गेल्या अनेक दिवसापासून मोरे कॉलनीतील आशीर्वाद क्लॉसेस समोर पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे.
पाईपलाईन गटारी कडेला असल्याने त्यातच गटारीचे पाणी जात असण्याची शक्यता आहे.शहरात अनेक ठिकाणी पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईन लिकेजचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.त्यात गटारीचे पाणी जाऊन दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचे नागरिकांचे सातत्याने आरोप होत आहे. नगरपरिषदेकडून कधी शुध्द पाणी पुरवठा मिळणार असा यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे.
जत शहरातील मोरे कॉलनी परिसरात पाणी पुरवठा पाईपलाईन फुटून पाणी रस्त्यावर येत आहे.







