दावण्या,करप्याने अडचणीतील द्राक्षबागायतदारांना मदत द्यावी

0जत,प्रतिनिधी : चांगले उत्पन्न देणारे पिक म्हणून जत तालुक्यात द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जात आहे. दरवर्षी विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल होतो.आता एप्रिल छाटणीनंतर आलेल्या द्रावण्या व करप्या रोगाने बागायतदार पुन्हा शेतकरी अडचणीत सापडण्याच्या भीतीने चिंताग्रस्त झाला आहे.
द्राक्ष काढणीचा हंगाम संपताच शेतकऱ्यांनी एप्रिल छाटणीला सुरुवात केली. या छाटण्याही पूर्ण झाल्या; परंतु त्यानंतर बागा फुटण्याच्या प्रतीक्षेत असतानाच दावण्या व करप्या रोगाने जत तालुक्यातील दरिबडची, संखसह तालुक्यात अन्य ठिकाणच्या बागावर आक्रमण केले आहे.मार्चपासून सुरू असलेल्या कोरोनाचा फैलाव व त्यातच रोगाने पछाडलेल्या द्राक्ष बागायतदार मोठ्या अडचणीत आला असून अशा रोगग्रस्त बागाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी दरिबडचीचे ग्रा.प.सदस्य अमोगसिध्द शेंडगे यांनी केली आहे.
 छाटणीनंतर खऱ्या अर्थांना द्राक्षवेलींना मजबूत व फुटवा तयार होणे गरजेचे असते.मात्र दावण्या व करप्या

Rate Card

या रोगाचा परिणाम द्राक्षवेलींवर होत आहे. शिवाय या फुटीमागे पुढे होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे शेतकरी वेगवेगळे उपाय करत आहेत.सबकेन झालेल्या बागांना जो डोळा दिसत आहे तो कुठे एक डोळा, तर कुठे दोन डोळे अशी सध्या बागांची अवस्था झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात घट होते की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून द्राक्षबागा धोक्यात येत असल्याने शेतकऱ्यांना उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त करावा लागत आहे.
फटक्यामुळे बेदाणाला अपेक्षित भाव मिळालेला नाही.त्यामुळे गतवर्षी केलेला खर्चही निघालेला नाही. बागायतदार अगोदरच आर्थिक अडचणीत आहे.पाठीमागचे कर्जही थकीत आहेत.पुढे बँका कर्जही देत नाहीत.त्यामुळे या हंगामात पिक घेयाचे कसे अशा द्विधा मनस्थिती तालुक्यातील बागायतदार आहेत.त्यामुळे कृषी व महसूल खात्याकडून प्रत्यक्षात नुकसान झालेल्या द्राक्षबागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ एकरी दोन लाख नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणीही शेंडगे यांनी केली आहे.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.