जत तालुक्यात कोरोनाचा आकडा हजारावर | बुधवारी सर्वाधिक 60 नव्या रुग्णाची भर

0
6

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोनाचा  बुधवारी सर्वाधिक 60 नवे रुग्ण आढळून आले.तालुक्यात कोरोना बाधिताचा आकडा हजार पार करून 1051 झाला आहेत.बुधवारी आलेल्या अहवालात जत शहरातील 23 बाधित रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जतला कोरोना धोका बळावला आहे.पुर्ण शहराला कोरोनाने विळखा घातल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. 



तालुक्यात उंटवाडी 2,वळसंग 2,बागेवाडी 1,सिंदूर 1,मुंचडी 1,बनाळी 8, शेगाव 8,नवाळवाडी 10,धावडवाडी 4 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.धावडवाडी,बनाळी,शेगाव,नवाळवाडीतील वाढलेले रुग्ण चिंता वाढवत आहेत.जत शहराबरोब ग्रामीण भागात वाढत असलेले रुग्ण धोकादायक ठरत आहेत.नागरिकांनी काळजी घ्यावी मास्क,सोशल डिस्टसिंग,सँनिटायझर सातत्याने वापर करावा,असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here