जिवघेणी वाहतूक कोंडी जीव गेल्यावर सुटणार काय? | जत शहरातील प्रमुख रस्ते फळगाडे,अति क्रमनाने व्यापले : पोलिस,पालिका प्रशासन चिडीचूप

0



जत,(प्रतिनिधी): कोरोनाच्या जनता कर्फ्यू नंतर सुरू झालेले जत शहरात पोलिस व नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पन्हा मुख्य बाजारातील वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. त्यातच गुहागर-विजापूर हा राष्ट्रीय मार्गाचे काम सुरू असल्याने या रस्त्यावर देखील कमालीची वाहतूक कोंडी होत आहे. जत पोलिस ही वाहतूक कोंडी फोडायची सोडून भलतेच कोडे सोडवत बसत असल्याने जतच्या नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे जतचा नागरिक ही कोंडी फुटण्याची प्रतीक्षा करत आहे.

Rate Card



जतमध्ये सर्वच बाजूने वाहतूक कोंडी होत आहे. मुख्य बाजारात तर ती जास्तच आहे.कोरोनाच्या लॉकडाऊन, अँनलॉक,जनता कर्प्यूनंतर बाजार सावरत आहे. तालुक्यातील नागरिक खरेदीसाठी जतला येत आहेत. यामुळे मुख्य बाजारात भलतीच वाहतूक कोंडी होत आहे. या विषयावर वारंवार चर्चा होऊनही यावर उपाययोजना सापडत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.



यासंदर्भात जत नगरपालिका, महसूल विभाग आणि पोलिस प्रशासन यांच्या बैठका झाल्या आहेत,पण यावर उपाय सापडला नाही. नेहमीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिस देखील जागेवर नसतात. याचा त्रास मात्र लोकांना सहन करावा लागत आहे. ही वाहतूक कोंडी कधी फुटणार, असाच सवाल उपस्थित होत आहे.नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीला सतत तोंड द्यावे लागत असून मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांच्यात घट होत आहे. याची जबाबदारी घेऊन जत नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत, अशी मागणी शहरातून होत आहे. दिवंगत विजयसिंहराजे ङफळे यांनी शहराची रेखीव पद्धतीने रचना केली आहे.



मात्र बेजबाबदार बांधकामे,अतिक्रमणे,रस्त्यावरील गाडे,वाहनाचे पार्किंग यामुळे शहराची दुर्दशा झाली आहे.कोन कुठेही खोके ठेवतेय,बांधकामे नियम सोडून सुरू आहेत.पन्नास रुपयाच्या करासाठी हातगाडे चालक थेट रस्त्यावर उभे करून व्यवसाय करत आहेत.त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे.यावर नियंत्रण ठेवणारा अधिकारीच नसल्याने जतला काहीही करा चालतेय अशी परस्थिती झाली आहे.



जत शहरातील कायम गजबलेल्या महाराणा प्रताप चौकात अशी वाहनाची कोंडी जीवघेणी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.