व्हसपेठचा तलाव 20 वर्षानंतर भरला

0
9



माडग्याळ, वार्ताहर : व्हसपेठ ता.जत येथील तलाव तब्बल वीस वर्षानंतर शनिवारी रात्री झालेल्या पावसाने ओव्हरफ्लो झाला.



कायम दुष्काळ पाचवीला पुजलेल्या व्हसपेठ, माडग्याळ परिसराला वरदान असलेला हा तलाव गेल्या वीस वर्षापासून कोरडा आहे.या परिसरात तलाव भरेल असा पाऊस झाला नव्हता.परिणामी व्हसपेठ,माडग्याळला तीव्र पाणी टंचाईचा फटका बसला आहे.दरम्यान शनिवारी रात्री या परिसरात तूफान पाऊस झाला.एका रात्रीत झालेल्या पावसामुळे तलाव तुंडूब भरून सांडव्यावरून पाणी वाहिले आहे.त्याशिवाय व्हसपेठ,माडग्याळ वडापात्रातील बंधारेही भरले आहेत.



एका पावसाने तलावाचा इतिहास बदलला आहे.तलावासह परिसरात पडलेल्या पावसामुळे समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान माडग्याळ, व्हसपेठचा पाणी प्रश्न यानिमित्ताने मिटला आहे.

व्हसपेठ ता.जत येथील तलाव भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here